ऑपरेशन प्रहार अंतर्गत जुगार अडयावर धाड एकुण १,८२, ५००/रू चा मुददेमाल जप्त उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण यांची संयुक्त कार्यवाही.
प्रतिनिधी: निलकंठ वसु पाटील
अकोट :आज दि.१९/१०/२०२५ रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हददीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निखील पाटील यांचे पथक तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथील पो. स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अकोट- अकोला रोडवरील होटेल सागवानवच्या मागे काही ईसम तीन पानी परेल नावाचा जुगार खेळत आहेत. अशा खात्रीलायक बातमीवरून सदरची माहिती सहायक पोलीस अधिक्षक श्री. निखील पाटील साहेब यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टॉफ व पंचासह जुगार रेड केली असता. एकुण ९ ईसम जुगार खेळतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष त्यांना नाव गाव विचारले असता. त्यांनी त्यांचे नाव १) मुरलीधर खंडुजी खंडारे, २) विशाल सुधाकर रोडे ३) श्रीकृष्ण बळीराम गावंडे ४) मंगेश दिनकर गवळी ५) पुरुषोत्तम अरूण भाकरे ६) अजय किसन डोंगरे ७) नईमोददीन हसनोददीन ८) आकाश प्रभाकर ढोकणे ९) हरिष देविदास बोदडे असे सांगीतले. त्यांच्या जवळुन घटनास्थळावरून पंचासमक्ष ५२ तास पत्ते, नगदी २२,५००/रू तसेच पाच मोटरसायकल किंअं १,६०,०००/रू असा एकुण १,८२,५००/रू मुददेमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतले. लेखी फिर्यादवरून पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक साहेब यांचे आदेशान्वये ऑपरेशन प्रहार अतंर्गत मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. बी. चंद्रकांत रेडडी, मा. सहा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर जुनघरे, पोहेकों शिवकुमार तोमर, पोकों राहुल कांबळे, पोकों विजय तायडे, पोकों रामेश्वर घंगाळ, पोकॉ योगेश डोबराव, पोकों आकाश घायल, पोकों राहुल ठाकुर यांनी केली.









