पुणे प्रतिनिधी शंकर जोग
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ व अहिंसा नवकार फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजू नागरिकांना दिवाळी फराळ, मिठाई व दीपावली साहित्य वाटप सोहळा संपन्न,
दीपावली हा दीपांचा आणि आनंदाचा उत्सव आहे. परंतु खरा आनंद तेव्हाच, जेव्हा आपल्या आजूबाजूला गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड व्हावी
याच उदात्त भावनेतून अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघ व अहिंसा नवकार फाउंडेशन यांच्या वतीने गोरगरीब नागरिकांसाठी दिवाळी फराळ, मिठाई व दीपावली साहित्य वाटप “आनंद सर्वांसाठी” हा सामाजिक उपक्रम दीपावली निमित्त साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत लॅप्रोसी कॉलनी, अंतुले नगर येवलेवाडी पुणे येथे समाजातील गरीब, गरजु विकलांग व वंचित बांधवांमध्ये फराळ, मिठाई व दीपावली साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास विशेष सहकार्य सागर फुलचंद लुनिया यांचे लाभले.
या प्रसंगी AIJMF राष्ट्रीय महामंत्री संदीप दादा भंडारी, फुलचंद लुणिया यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजक महेंद्र सुंदेचा मुथ्था, प्रकाश बोरा, मयुर सरनोत (वरवंडकर), रोशन कोटेचा, विनोद सोलंकी, श्रीमल बेदमुथा, महेश खिंवसरा, गौरव मुनोत, संतोष बोरा आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघ व अहिंसा नवकार फाउंडेशनचे सदस्य दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील गरीब, अनाथ, विकलांग व अंध बांधवांमध्ये आनंद वाटून दीपावलीचा खरा अर्थ साकारत आहेत.









