आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी, देवळी येथे देवळी शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. शहरातील अद्यावत CCTV Surveillance System आणि CCTV Command & Control Center कक्षाचा भव्य उद्घाटन सोहळा आज उत्साहात पालक मंत्री वर्धा जिला मा ना श्रीमान पंकज जी भोयर यांचे शुभ हस्ते पार्पडला
प्रतिनिधी अब्दुल कादीर शेख
या उपक्रमाचा उद्देश देवळी शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी वाढवणे हा आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शहरातील प्रमुख चौक, व्यापारी भाग, सार्वजनिक स्थळे आणि महत्त्वाच्या मार्गांवर उच्च क्षमतेचे CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण आणि देखरेख करण्यासाठी CCTV Command & Control Center स्थापन करण्यात आले असून, तेथून रिअल टाइम मॉनिटरिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शहरात घडणाऱ्या घटनांवर त्वरीत कारवाई करता येणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होणार आहे. या योजनेमुळे देवळी शहर “स्मार्ट आणि सुरक्षित शहर” या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.
यावेळी वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अनुरागजी जैन, माजी खासदार श्री. रामदासजी तडस साहेब, पुलगाव देवळी विधानसभेचे आमदार श्री. राजेशजी बकाने, पोलीस अधिकारी, पोलीस बांधव, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मो मकसूद बावा पत्रकार








