‘किनारा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
आदगाव (कोकण) येथील निसर्गरम्य वातावरणात शूटिंग सुरू असलेल्या ‘किनारा’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. चित्रीकरण संपल्याच्या निमित्ताने चित्रपटाचे मुख्य अभिनेते आनंद बुरड यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन येईल. ‘किनारा’ हा चित्रपट विनोदी आणि रहस्यमय या प्रकाराचा असून, त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आता लवकरच पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांसमोर एक नवी आणि वेगळी गोष्ट आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या चित्रपटाची निर्मिती ‘अष्टसिद्धी पिक्चर्स’ अंतर्गत करण्यात आली असून, अंतोदय नारायण सिन्हा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. आनंद बुरड यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेता प्रताप गाडेकर एका पॉवरफुल नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पृथ्वी काळे आणि श्रुती गव्हाणे या दोन अभिनेत्री मुख्य नायिकांच्या भूमिकेत आहेत.
‘किनारा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुशील शर्मा यांनी केले आहे, तर प्रतीक पाटील यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे. सुरेश अग्रवाल हे क्रिएटिव्ह डायरेक्शन आणि कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहत आहेत. तसेच, तुषार पाटोळे हे सहयोगी दिग्दर्शक असून, लोकल प्रॉडक्शनची जबाबदारी स्वरूप नाईक यांनी पार पाडली आहे. कला दिग्दर्शन मंदार कुंभार यांनी केले आहे, तर हुर यांनी वेशभूषा, रंगभूषा आणि केशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.
या चित्रपटात राजू जोशी, कान्हा तिवारी, आदित्य निघोट, गणेश निगडे, संतोष मोरे, भीमा धानापुणे, किरण मोरे, तसेच कोरिओग्राफर अनिकेत गायकवाड यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संकलन संकेत गोसावी करत आहेत. पंकज दाभाडे यांनी स्थिर छायाचित्रणाचे काम केले आहे.
चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे.









