खिशात शंभर रुपये, डोळ्यात स्वप्न…
अल्ताफ शेख यांची ‘कर्मयोगी’ वाटचाल!
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
सोलापूर जिल्ह्याच्या मातीतील एक साधा मुलगा, खिशात केवळ शंभर रुपये, पण डोळ्यात प्रचंड स्वप्ने! हा मुलगा म्हणजेच अल्ताफ दादासाहेब शेख— स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत; पण स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो ही गोष्ट अल्ताफ यांनी सत्यात उतरून दाखवली. आज पुण्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेला, नॅशनल आणि इंटरनॅशनल पुरस्कार विजेता, गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारा नावाजलेला दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि निर्माता! “जिंदा रहूँगा तब भी चर्चा में रहूँगा,
और मरने के बाद भी चर्चा में रहूँगा” या त्यांच्याच शायरीतून त्यांचं ध्येयवेड दिसतं. त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊया त्यांचा थक्क करणारा यशाचा प्रवास.
पत्रकार: “शंभर रुपयांतून सुरू झालेली गाथा” काय सांगाल आपल्या बालपण आणि संघर्षाबद्दल!
अल्ताफ शेख: लहानपणापासूनच माझ्या मनात लेखक-दिग्दर्शक होण्याचं स्वप्न होतं. शाळेत असताना ‘माझं स्वप्न’ या विषयावर मी लिहिलेल्या निबंधातच मी सिनेसृष्टीत करिअर करणार असल्याचं जाहीर केलं. शिक्षकांनी फटकारलं, वडिलांनी काळजी व्यक्त केली, पण माझं ध्येय मात्र अढळ राहिलं.
पुढे जबाबदाऱ्या वाढल्या, अवघे १०० रुपये घेऊन गाव सोडलं, पुण्यात बुटिक सुरू केलं; पण मनातला कलाकार जिवंत राहिला. २०१० मध्ये शून्यातून प्रवास सुरू केला—कधी फुकट कपडे शिवले, कधी प्रोडक्शनचं काम केलं, कधी आर्ट डायरेक्शन, तर कधी डिझायनिंग. आणि तिथूनच घडला संघर्षाचा पहिला अंक.
पत्रकार: आपला नुकताच सुपरहीट ठरलेल्या चित्रपटाविषयी थोडं सांगा.
अल्ताफ शेख: २५ ऑक्टोबर रोजी चित्रपट ‘कर्मयोगी आबासाहेब’ जगभर प्रदर्शित झाला. दिवंगत माजी कॅबिनेट मंत्री गणपतराव देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट केवळ एक बायोपिक नाही, तर समाजकारणाला नवी दिशा देणारी प्रेरणागाथा ठरला. जगभर सुपरहिट झाला.
*‘वेडा बीएफ’ ते ‘कर्मयोगी आबासाहेब’ आता “एट पोस्ट बिहाली” पर्यंत…*
पत्रकार: आपल्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासाविषयी थोड जाणून घ्यायचं आहे.
अल्ताफ शेख: पूर्वी मी 18 पेक्षा जास्त चित्रपट लोकांच्या नावावर लिहिले. त्याच्या बदल्यात फक्त पैसाच भेटला; पण स्वतःच नाव झालं नाही.
२०१८ मध्ये ‘वेडा बीएफ’ या चित्रपटाद्वारे मी दिग्दर्शन क्षेत्रात दमदार पाऊल टाकलं. हा सिनेमा सलग तीन आठवडे रंगमंचावर गाजला. खरी ओळख ही वेडा बीएफ चित्रपटापासून भेटली. त्यानंतर ‘लोरी’ या हिंदी चित्रपटात संगीत दिग्दर्शन केलं. मग हा प्रवास धारावी कट्टा, कम ऑन विष्णू, ब्रेक डाऊन, त्यातच एक मोठं स्वप्न साकारलं आहे—‘कर्मयोगी आबासाहेब’. हा केवळ एक चित्रपट नाही; तो समाजकारण, आदर्श नेतृत्व आणि संघर्षातून घडलेल्या वारशाची कहाणी आहे. देश, विदेशातील प्रेक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
आज “एट पोस्ट बिहाली” ही फिल्म धमाकेदार एंट्रीत प्रदर्शित होत आहे व अनेक फिल्म्स अंडर शूटींग चालु आहेत.
जागतिक मानाचा प्रवास.
पत्रकार: सर, आपल्याला अनेक जागतिक, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर या यशाविषयी!
अल्ताफ शेख: हो! हे सर्व प्रेक्षकांच्या बळावर झालं आहे. पुरस्कारांविषयी म्हणाल तर, अँम्सटरडॅम लिफ्ट-ऑफ,
क्राउनवूड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शन, “गिनीज बुक आणि हाई रेंज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली, जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या Marché du Film (मार्शे दु फिल्म) मार्केटमध्ये उपस्थितीची नोंद झाली. बेंगलोर- इंटरनॅशनल पॅनोरामा फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,
थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,
यु.के. सिडनी – लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,
लाहोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,
स्विडन- फायनलिस्ट फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,
क्राऊन वूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,
भारत नॅशनल ऍवॉर्ड, स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड,
Tamizhagam इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड,
गोल्डन लायन फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड, वेस्टन युरो फिल्म फेस्टिवल (बेस्ट डायरेक्टर) दादासाहेब फाळके पुरस्कार इत्यादी मानाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 50 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
*समाजाला दिशा देणारा सिनेमॅटिक योद्धा…*
पत्रकार: आपल्या या जीवन प्रवासात काही लोकं असतील जे आपल्या पाठीशी असतील अशांविषयी आपल्या भावना!
अल्ताफ शेख: “जीवनात मी कधी हरलो नाही, फक्त प्रयत्न सुरू ठेवले. माझ्या मागे कुटुंबाचा, विशेषतः भाऊ सय्यद शेख आणि फराना शेख यांचा भक्कम पाठिंबा होता. आज मी जे काही आहे ते त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या विश्वासामुळेच.”
पत्रकार: आजच्या पिढीला मार्गदर्शन करतांना आपण काय संदेश द्याल?
अल्ताफ शेख: युवकानी परिस्थिती न पाहता सद्यस्थिति वर लक्ष केंद्रित करुण यशवंत व्हावे!
एक अविस्मरणीय मुलाखत!
गुगल सर्च करून बघू शकता: अल्ताफ दादासाहेब शेख no 8975303924









