🔴 तेल्हारा तालुक्यात खुलेआम वरली मटका धंदा — प्रशासनाचे दुर्लक्ष?
अकोट प्रतिनिधी — निळकंठ वसू (मो. 7820899963)
तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागात खुलेआम वरली मटका सुरू असल्याचे समोर आले आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधीने घेतलेल्या ग्राउंड रिपोर्टनुसार, अनेक गावांमध्ये मटका माफिया निर्भयपणे हा अवैध व्यवसाय चालवत आहेत.
सदर माफियांना काही संबंधित कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे ते बिनधास्तपणे गोर-गरीब जनतेला लुबाडत लाखो रुपये गोळा करत असल्याचेही समोर आले आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे मौन आणि दुर्लक्ष यामुळे सामान्य नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करून सामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.








