संकल्प अर्बन पतसंस्था ला फेडरेशनचा चा मानाचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान.
प्रतिनिधी सारंग महाजन
अत्यंत अभिमानाने सांगावस वाटत की उदयनगर येथील संकल्प अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे सन 2024 -25 वर्षा साठी दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे. अमरावती विभागातील दिशादर्शक आणि उत्कृष्ट कार्याबद्दल उदयनगरीतील संकल्प अर्बन पतसंस्थेला हा मानाचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान मा. श्री काकासाहेब कोयटे( अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन) तसेच सन्माननीय मा. आमदार श्री राहुल भाऊ बोंद्रे यांच्या शुभहस्ते डेनीसन्स रिसॉर्ट, कुमठा, कर्नाटक दि.12 ऑक्टोंबर 2025 रोजी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे पतसंस्थेच्या सभासदांचा विश्वास कर्मचारी वर्गाचे परीश्रम, आणि महिला बचतगटाच्या एकजुटीचा गौरवपूर्ण क्षण आहे. संकल्प अर्बनचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर केनेकर व उपाध्यक्ष श्री अक्षय करंडे यांनी समाधान व्यक्त करत सांगितले हा सन्मान समाजातील आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने प्रयत्नांची ओळख आहे यापुढेही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध भाऊ असे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सांगितले. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सभासदा करून कर्मचारी वर्ग व संस्थेच्या ग्राहकाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.









