पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडला.
प्रतिनिधी तेजस विजय विचारे
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्राचे वनमंत्री,
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडला. या दरबारात नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्वरित निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रसंगी मा. खासदार डॉ. संजीवजी नाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीपजी लेले, ठाणे-पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. संजयजी वाघुले, अॅड. धनंजय सिंहजी यांसह विविध शासकीय अधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजप पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ठाणेकर उपस्थित होते.
जनतेशी थेट संवाद साधल्यामुळे आणि चर्चा केल्यामुळे त्यांच्या समस्या जवळून समजून घेण्यात मदत झाली.
