तीन वर्षाच्या “नृत्या’ ची दुर्मिळ – गंभीर आजारांशी झुंज
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
मदतीचं आवाहन
सावंतवाडी येथील तीन वर्षाची चिमुरडी नृत्या महेश जांभोरे ही अतिशय दुर्मिळ आणि गंभीर स्वरुपाच्या निमोनिया या आजारांशी झुंज देत आहे.गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर सुरू असलेल्या महागड्या उपचारांमुळे जांभोरे कुटुंबीयांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे तिच्या वडिलांनी नृत्य दिग्दर्शन श्री महेश यांनी कलावंत मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजाला मदतीचे कळकळीचे आवाहन केले आहे.
गंभीर आजार आणि वाढता खर्च
नृत्यावर गेले ८ ते१० दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृतीत समाधानकारक सुधारणा न झाल्याने तिला तातडीने कोल्हापूर येथील साई स्पर्श चिल्डन्स हाॅस्पिटल मध्ये हलवण्यात आले आहे आतापर्यंत उपचारासाठी दोन लाखांहून अधिक खर्च झाला आहे आणि कोल्हापूरमध्ये सध्या डॉक्टरांकडून सर्वात महागडी लास्ट स्टेजची उपचार पद्धती करण्यात आली आहे.
नृत्याच्या उपचारांचा खर्च दररोज वाढत असून सद्ध्य: स्थिती लक्षात घेता हा खर्च १० ते १५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे नृत्य क्षेत्रात कोरिओग्राफी म्हणून काम करणारे तिचे वडील महेश जांभोरे यांना वाढता खर्च परवडणारा नाही नृत्याने जन्माच्या पहिल्या वर्षापासूनच अनेक आजारांशी लढा दिला असून त्यावेळीही तिच्या उपचारांवर कुटुंबांने बरीच पूंजी खर्च केली आहे २५ सप्टेंबरच्या आसपास नृत्या अचानक अस्वस्थ झाली आणि तातडीने दाखल केल्यावर तिला निमोनिया झाल्याचे निदान झाले तेव्हापासून तिची जगण्याची धडपड सुरू आहे.
कलाकार मित्रमंडळाचे आवाहन
महेश जांभोरे मूळचे नंदुरबारचे असून सावंतवाडीत आतेकडे राहून त्यांनी मिळेल ते काम करत शिक्षण घेतले आणि नृत्य कलेची उपासना केली त्यांनी कधीही कोणाकडे मदत मागितली नाही मात्र पोटच्या मुलीला जीवांसाठी आणि वाढत्या खर्चापुढे हतबल झाल्याने त्यांच्या मित्र परिवाराने हे मदतीचे आवाहन केले आहे.प्रत्येक दानशूर व्यक्तींने आपल्या परीने मदत करावी जेणेकरून नृत्यावर तातडीने उपचार सुरू राहतील
