महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडोनेश्या देशाचे पदमश्री अगूस उदयाना यांना महात्मा गांधी पुरस्कार व आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना उदयाना यांच्या हस्ते सन्मान
पुणे – कोथरूड येथील गांधी भवन हॉलमध्ये आज रोजी “राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार सोहळा” संपन्न झाला.राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार समिती आणि ट्रॅव्हएक्स्पर्ट डेस्टिनेशन्स यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा मानाचा पुरस्कार इंडोनेशियातील बाली येथील गांधी पुरी आश्रमचे ‘पद्मश्री अगुस इंद्रा उदयाना’ यांना जाहीर करण्यात आला होता. भारताबाहेर महात्मा गांधींचे विचार व कार्य प्रसारित करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार एअरमार्शल अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे किसन भोसले होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट अभय छाजेड म्हणाले,”गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले आणि त्यांनी स्वातंत्र्य लढा सुरु केला तेव्हा जगभरात महायुद्धाचे सावट होते, महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा दिला त्यावेळी हे खरे महत्वाचे होते, आजचे पुरस्कारारार्थी पदमश्री अगूस इंद्र उदयाना हे खऱ्या अर्थाने गांधीजींचे अनुयायी आहेत हे त्यांच्या इंडोनेशियामधील गांधीपुरी आश्रमाच्या स्थापनेवरून दिसून येते. गांधीजींचे विचार परदेशात प्रचार प्रसार करणारे शरयू अगूस हे या पुरस्काराचे मानकरी आहेत…”कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर मार्शल श्री अविनाश क्षीरसागर ज्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला “देशाला पुढे न्यायचे असेल तर शिक्षण फार महत्वाचे आहे तसेच गांधीजींनी दिलेली स्वच्छतेची शिकवणूक आज प्रत्येक भारतीयाने अंगीकारणे महत्वाचे आहे.” या सोहळ्याला चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक धनंजय भावलेकर या अॅड. अभय छाजेड, सचिव अन्वर राजन, माजी नगरसेवक प्रदीप (बाबा) धुमाळ, जमिर मुल्ला, लेखक-दिग्दर्शक धनंजय भावलेकर, दिग्दर्शक सागर वंजारी, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, मनोविकास प्रकाशन चे अरविंद पाटकर, प्राज इंडस्ट्रिजचे राजेंद्र मोरे, समृद्धी हॉटेलचे अरविंद चव्हाण, सुनिल पवार, के. पी. जगताप, संदीप बर्वे, सचिन पांडुळे, रुपेश पार्टे, सचिन पार्टे, प्राणजित गवंडी, कुणाल मालुसरे, डॉ.राकेश शालगर, शशांक पाटील, शेखर ढमाले, नेहा ढमाले, कॅप्टन जगदीश जोशी, शैलेंद्र उत्तेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले या कार्यक्रमाचे आकर्षक ठरल्या आहे आपल्या मुलांना शिक्षणाचे मार्ग दिला आदिवासी पारधी समाजामध्ये महात्मा गांधीचे विचार मांडले गांधींचे विचाराने काम करत राहिले पारधी समाजाचे मुलं मुली आजही मार्गदर्शन घेण्यासाठी येतात माझी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्ठ अवॉर्ड मिळाला त्यांच्या विचाराने अनेक मुलं मुली स्वतःच्या पाया वर उभे राहिले आहे व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. ट्रॅव्हएक्स्पर्ट डेस्टिनेशन्स प्रमुख माधवी शेलार यांनी कार्यक्रमची प्रस्तावना केली तर सुत्रसंचालन कपिल घोलप यांनी केले, आभार श्री राहुल शेलार यांनी व्यक्त केले.या सोहळ्याचे आयोजन श्री. राहुल भरत शेलार व सौ. माधवी राहुल शेलार यांनी केले लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य भटक्य विमुक्त जाती जमाती आदिवासी प्रदेश आध्यक्ष पत्रकार सुनिल शेवाराबाई ज्ञानदेव भोसले . पत्रकार स्नेहा उत्तम मडावी










