दसऱ्याच्या मंगलदिनी “भावड्या” चित्रपटाचा झगमगाटात शुभारंभ!
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एक नवा टप्पा गाजवणारा “भावड्या” चित्रपटाचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
या सोहळ्यास निर्माता आबा निर्मळ, निर्माता-लेखक ज्ञानदेव शिंदे, दिग्दर्शक प्रमोद पंडीत, तसेच अनुपम सेल्स कॉर्पोरेशनचे उमेश पन्हाळे व सतीश कदम सर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. ठिकाणी पारंपरिक वातावरण, फुलांची सजावट आणि मराठी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली.
भावड्या” हा चित्रपट एका गरीब मुलाच्या आयुष्याचा संघर्ष मांडतो. भावड्या हा गावातील लोकांच्या टोमण्यांचा बळी ठरलेला, हाल-अपेष्टा सहन करून जगणारा मुलगा असतो. पण या हालचालींच्या गर्तेतून उभं राहून तो स्वतःची वाट शोधतो. गरिबी, समाजाचे उपहास, आणि जिद्दीची ज्योत यांचा संगम या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
निर्माते आबा निर्मळ यांनी सांगितले की, “भावड्या” ही केवळ कथा नाही, तर अनेक गरीबांच्या आयुष्याचं खरं दर्शन घडवणारी कहाणी आहे.
दिग्दर्शक प्रमोद पंडीत म्हणाले, हा सिनेमा प्रेक्षकांना हसवेल, रडवेल आणि विचार करायला लावेल.
या चित्रपटात भावना, नाट्य, संघर्ष, आणि सिनेमॅटिक थरार यांचा सुंदर मेळ साधण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच मनापासून भावेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.
दसऱ्याच्या शुभदिनी झालेला हा शुभारंभच सांगतो की, “भावड्या” मराठी सिनेसृष्टीत नवा सोनेरी अध्याय लिहिणार आहे.
लवकरच शूटिंगला सुरुवात होत आहे
