रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
अकोट: प्रतिनिधीनिळकंठ वसू पाटील
29सप्टेंबर
जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून स्व. मोतीरामजी चिंचोळकर मूकबधीर विद्यालय, ( निवासी) अकोट येथील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजातील मूकबधीर विद्यार्थ्यांना इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षण देऊन त्यांना समाजप्रवाहात आणण्याकरिता मूकबधीर विद्यालय खूप मोलाची भूमिका निभावत असते. अशा विद्यार्थ्यांच्या खडतर मार्गात कुठेतरी आनंदाचे क्षण निर्माण करण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन कार्यात उपयोगी पडेल असे लेखन साहित्य, रंगपेटी, मिष्ठान्न इत्यादीचे वाटप अध्यक्ष रोटे रवि पवार, राजकुमार गांधी, उध्दव गणगणे,संतोष इस्तापे, श्याम शर्मा, शिरीष पोटे, दीपक कतोरे, नावेश मोहता यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. रोटे राजकुमार गांधी यांनी त्यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता रोटरी क्लब ऑफ अकोट भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी प्र. मुख्याध्यापक जयदीप राऊत, मच्छिंद्र नागरे, अक्षय भागवत, संतोष चिंचोळकर, वेद राजगुरू, प्रविण चांदूरकर, दीपक कवदे व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.








