महापुरुष मित्र मंडळ कोकणनगर येथे भक्तीभावाने तसेच उत्साहाने शिवसेना व उद्धजी ठाकरे पक्षाचे उपनेते मा श्री सुरेन्द्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांनी मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले
प्रतिनिधी मुकूंद मोरे
श्री महापुरुष मित्र मंडळ, कोकणनगर येथे भक्तिभावाने व उत्साहाने एक आगळावेगळा क्षण अनुभवायला मिळाला. शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे उपनेते मा. श्री.
सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांनी मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले आणि माता राणीसमोर मस्तक ठेवत सर्व जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली
या मंगल प्रसंगी मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री. चैतन्य इप्ते यांनी बाळासाहेब माने यांचा मान्यवर सत्कार शाल, श्रीफळ व देवीची चुनरी देऊन केला . यावेळी खजिनदार श्री. रोहन वरेकर, सचिव सिद्धेश किड्ये, तसेच मंडळाचे कार्यकर्ते व सदस्य मोहन पाटील, बुधाजी पवार, प्रसाद साळुंखे, करण इप्ते आणि मंदार नाचणकर यांची उपस्थिती लाभली
भक्तिभावाने सजलेले मंडप, देवीसमोर वाहिलेली फुलांची आरास, घंटानाद व ढोल-ताशांचा गजर, आणि भक्तांच्या जयजयकाराने संपूर्ण वातावरण दरवळून गेले. एकोपा, श्रद्धा आणि समाजसेवेचा अनमोल संदेश या प्रसंगी अधोरेखित झाला








