बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत कार्यानुभव विभागामार्फत कंदील स्पर्धा
प्रतिनिधी गणेश तळेकर
आज सोमवार दिनांक 29/09/ 2025 रोजी सकाळी 8:00 ते 11:00 या वेळेत घेण्यात आली. सन्मा. शिक्षणाधिकारी श्रीम. सुजाता खरे मॅडम व सन्मा. उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) श्री. किर्तीवर्धन किरतकुडवे साहेब, श्रीम. छाया साळवे मॅडम (अधिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव विभागाच्या निदेशक श्रीम. तृप्ती पेडणेकर मॅडम यांनी या स्पर्धेचे योग्य नियोजन करून या स्पर्धेस विद्यार्थ्यांंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
25 वाॅर्ड मधून 8 कार्यानुभव उदबोधन केंद्रांतर्गत एकूण 54 स्पर्धा केंद्रावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व भाषिक शाळा, एम.पी.एस., सीबीएसई, आयसीएसई अशा सर्व शाळेतील इयत्ता 6 वी ते इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
इयत्ता 6 वी च्या विद्यार्थ्यांनी पणत्या तयार केल्या, इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांनी कटवर्क रांगोळी तयार केली. आणि इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध माध्यम वापरून आकाश कंदील तयार केले.

एकंदरीत स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक अशा कलाकृती तयार केल्या.
नियोजनानुसार सर्व कार्यानुभव शिक्षकांनी यशस्वीपणे ही स्पर्धा पार पाडली. स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कार्यानुभव वरिष्ठ शिक्षक, केंद्र प्रमुख, उप केंद्र प्रमुख व सर्व कार्यानुभव शिक्षकांनी चांगले सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्याने आजची” कंदील स्पर्धा” व्यवस्थित पार पडली.








