डीजे’ वरील 35 प्रकरणांत खटला दाखल… सुनिल फुलारी यांची माहिती गणेशोत्सवात कारवाया..!!
प्रियांका देशमुख सातारा जिल्हा प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या काळात डीजे सिस्टीम बाबत 35 प्रकरणात खटले दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस दलामार्फत सुरू आहे. मात्र गणेशोत्सव व नवरात्र उत्सव या कालावधीत डीजे सिस्टीम बंदच राहिली पाहिजे त्यासाठी पोलीस दलामार्फत प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी सुनील फुलारी पुढे म्हणाले सातारा पोलीस दलाने जिल्ह्यातील 6 टोळ्यांवर मोक्याची कारवाई केली आहे. अजूनही तीन टोळ्यांवर कारवाईचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. गुन्ह्यांचे डिटेक्शन 100 टक्के झाले पाहिजे अंमली पदार्थात विरोधात कोल्हापूर परिक्षेत्रात कारवाई सुरू आहे. गहाळ झालेले मोबाईल शोधून संबंधितांना परत देण्यात सातारा जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागत आहे. सातारा पोलीस दलाने विविध गुन्ह्यांच्या तपासात चांगलीच कामगिरी केली आहे. मी सातारा पोलिसांचे त्याबाबत विशेष कौतुक करतो. त्यानंतर पुणे येथे झालेल्या कर्तव्य पोलीस मेळाव्यात यश मिळवलेल्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर स.पो.नि. अन्वर उस्मान मुजावर निखिल यादव अमोल गवळी दत्तात्रय चव्हाण सचिन भोसले यांचा प्रमाणपत्र व मेडल देवुन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.








