कर्तव्यदक्ष महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची गुन्हेगारांवर करडी नजर नेहमीच प्रयत्नशील..!!
संभाजी पुरीगोसावी पुणे जिल्हा प्रतिनिधी
कर्तव्यदक्ष आणि गुन्हेगारांवर नेहमीच करडी नजर असणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यांतील असून वृषाली देसाई यांनी लहानपणापासूनच जिद्द ठेवली होती. चांगले शिक्षण घेवुन शासकीय सेवेत जाण्याची जिद्द त्यांच्या मनात कायम होती. वृषाली देसाई यांचे वडील अशोक देसाई हे देखील शासकीय खात्यात कार्यरत होते. देसाई यांच्या कुटुंबालाही शासकीय सेवेची परंपरा असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते. वृषाली देसाई यांच्या मनात त्यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात नोकरी करण्याची इच्छा होती. अखेर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात आपल्या यशाला गवासणी घातली.. की आपल्या घरात कोणीतरी पोलीस अधिकारी झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. वृषाली देसाई यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चंदगड येथे पूर्णता करताच त्यांना खाकी वर्दीचे वेध चांगलेच लागले होते. त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात म्हणजे 2014 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्या नाशिक या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्या आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून आल्या. त्यांची पहिल्यांदाच सातारा जिल्हा पोलीस दलात नियुक्ती झाली यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यात फलटण ग्रामीण सातारा तालुका शिरवळ खंडाळा या पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य बजावताना वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले होते. कोरोनाच्या काळातही त्यांचे कर्तव्य हे सातारा जिल्ह्यात कौतुकास्पद ठरले, त्यांचा सातारा जिल्हा पोलीस दलातील कालावधी पूर्णता: झाल्यामुळे त्यांची पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली झाली असून. सध्या त्या पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. अशा या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याला आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन मानाचा सलाम आहे.








