अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
युवा संवर्धन समिती आणि प्रियंका मल्टिसर्विसेस चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद भगतसिंग जयंती साजरी
विद्यादेवी निवासी अपंग विद्यालय चिखली येथे शैक्षणिक साहित्य व फराळाचे वाटप
चिखली : प्रतिनिधी सिद्धार्थ धंदेरे
स्थानिक चिखली येथील विद्यादेवी निवासी अपंग विद्यालय येथे दिनांक २८/०९/२०२५ रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून युवा संवर्धन समिती आणि प्रियंका मल्टिसर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या वर्षीसुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रियंका मल्टिसर्विसेस चे संचालक श्री. सुमेध जाधव सर यांचा मोलाचा वाटा असतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा संवर्धन समितीचे श्री. सचिन साळवे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका मल्टिसर्विसेसचे संचालक सुमेध जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांनो अपंगत्वावर मात करून उंच भरारी घ्या असे यावेळी सुमेध जाधव यांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. युवा संवर्धन समितीचे सदस्य तसेच जवाहर अर्बनचे शाखा व्यवस्थापक श्री. रामदास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी विद्यालयाचे श्री. तांबेकर सर, गायकवाड सर, विशाखा २४ न्यूजचे श्री. राहुल पवार सर, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तसेच श्रीराम नागरी सहकारी संस्थेचे शाखा व्यवस्थापक सिद्धार्थजी धंदरे, युवा संवर्धन समितीचे श्री. अरुण भिसे तसेच प्रवीण डोंगरदिवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिद्धार्थ धंदरे यांनी केले.










