करमाळा पोलिसांची दमदार कामगिरी, 50 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व 2 राऊंड हस्तगत… जागेवर आरोपींला ठोकल्या बेड्या…!!
सुप्रिया गिरी गोसावी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
करमाळा पोलीस नवरात्रीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पो. कॉ. अर्जुन गोसावी यांना गोपनीय माहिंतीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून करमाळा शहरांत एक इसम कमरेला गावठी पिस्तूल बाळगून संशयरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना याबाबत कळविले असता पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून आपल्या पोलीस ठाणेकडील कर्मचाऱ्यासह मौलाली माळ येथे धाव घेतली असता जागेवरच संशयितांची अंगझडती घेतली असता. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन पितळे धातूचे जिवंत राऊंड असा एकूण 50,000/रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. आमिन रशीद बेग (वय 33 ) रा. मौलाली माळ करमाळा ता. करमाळा जि. सोलापूर ) असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगले रविराज गटकुळे मिलिंद दहीहांडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान भराटे अमोल रंदिल गणेश खोटे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील वेंकटेश मोरे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.








