पुण्यात रिल्स करणाऱ्या महिलेला शरीर सुखाची मागणी, तू माझ्यासोबत एक रात्र झोप, एकावर गुन्हा दाखल…
संभाजी पुरीगोसावी पुणे जिल्हा प्रतिनिधी.
पुणे शहरांतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरात्रीच्या उत्सवांच्या कार्यक्रमांत एका महिला रीलस्टारकडे शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीवरून नवरात्रीच्या उत्सवादरम्यान आयोजित आयोजित करण्यात आलेल्या हास्य कार्यक्रमांत एका महिला रिलस्टारकडे शरीर सुखाची मागणी करत तू माझ्याशी एक रात्र झोप, असे म्हणून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले आहे. पीडिता रिलस्टार महिला ही पुणे जिल्ह्यातील एका गावात कुटुंबासोबत राहते तिच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निफनाथ सुदाम जगदाळे ( वय 39 ) रा. माळी मळा लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चे नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 351 ( 2 ) ( 3 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.








