आईवडिलांकडून एक चूक घडली
ती मुलाला आयुष्य भर नडली
प्रतिनिधी मुकूंद मोरे
उद्या दिनांक २६ सप्टेंबर ला सकाळी सात वाजता ऑपरेशन झाले
‘साई’ कपिल कांगडा वय वर्षे ५. वडिलांचे नाव कपिल नरेश कांगडा तर आईचे नाव पिंकी कपिल कांगडा. काम सार्वजनिक शौचालय KDMC H/7-4 साफ करणे. राहणार डोंबिवली पश्चिमच्या ठाकुरवाडी फुलेनगर येथील शौचालय.
हे शौचालय तीन मजली आहे. आणि याच तीन मजली शौचालयाची गच्ची हे या दांपत्याचं राहण्याचं ठिकाण आहे. या शौचालयात तिन्ही मजल्यांवर लोकांची सतत ये जा असल्याने शौचालयाचा लोखंडी जिना सतत ओला असतो. याच ओल्या जिन्यावरुन चारवर्षीय वर्षीय साईचा पाय घसरला आणि बरोबर कंबरेच्या वरच्या मधल्या बाजूला दुखापत झाली. खरचटलं असेल म्हणून आईवडीलांनी जखम मनावर घेतली नाही व घरीच उपचार केले. ५-१० दिवसांनी जखम जास्त चिघळली. म्हणून साईला आजुबाजुच्या दवाखान्यात घेऊन गेले. इथेही औषधोपचाराचे १५ दिवस निघून गेले. त्यानंतर जखम बरी होत नाही म्हणून परवडेल अशा मोठ्या दवाखान्यात गेले. त्यांनी मात्र गोळ्या औषधे देऊन MRI काढण्याचा सल्ला दिला. पाठीच्या मणक्याचा MRI काढण्याचा खर्च ५ ते ७ हजार. तेवढे पैसे नाहीत म्हणून कोणीतरी सल्ला दिला की गावाला जा तिकडे कमी खर्चात होईल. साईला हे दांपत्य गावाला घेऊन गेले. तिथेही १ महिना घालवला. जखम बरी व्हायचं नाव घेत नव्हती. ती चिघळतच गेली. जखमेतून पाण्यासारखा चिकट द्रव आणि पुढे ३-४ दिवसांनी ‘पु’ यायला लागला. विषय गंभीर आणि आपल्या हाताबाहेरचा असल्याने तिकडच्या डाॅक्टरांनी सल्ला दिला की साईला मुंबईला वाडीया हाॅस्पीटलला घेऊन जावा. वाडीया हाॅस्पीटलच्या डाॅक्टरांनी देखील MRI काढण्याचा सल्ला दिला. आणि एकंदरीत ३० ते ३५ हजार खर्च येईल असं ऐकवलं. खर्चाचा हा आकडा ऐकून त्याच्या छातीत धडकी भरली. घरी येऊन जखम स्वस्तात बरी होईल का म्हणून आजुबाजुच्या डाॅक्टरांकडे परत फिरवू लागले. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा झाला की जखम चिघळत गेलीच पण साईला या दरम्यान ‘टीबी’ने सुद्धा ग्रासलं. प्रमाणाच्या बाहेर वजन कमी झालं.. मग कुणीतरी जुनी डोंबिवलीच्या रिक्षा वाल्यांनं सल्ला दिला की प्रल्हाद म्हात्रेंकडे घेऊन जा. आईवडील साईला घेऊन माझ्याकडे आले. साईची परिस्थिती पाहून मला गहिवरून आलं आणि त्याच क्षणी मी त्याला माझ्या मांडीवर उपचाराची जबाबदारी घेऊन बसवलं.. लगेच दुसऱ्या दिवसापासून वाडीयाची ट्रीटमेंट सुरू केली. MRI केल्यानंतर लक्षात आलं की पाठीच्या मणक्याला मोठ्या प्रमाणावर इजा झाली आहे. त्यामुळे १५ दिवस १ महिना ऍडमिट करून जखम आणि टीबी वर नियंत्रण आणावे लागेल. नंतर मणक्याची शस्त्रक्रिया करून पुढे १-२ महिन्यात मणक्यात राॅड टाकावा लागेल. आता साईच्या पाठीमागे मी असल्यामुळे दांपत्याची चिंता मिटली होती. परंतु टीबी, जखम आणि शस्त्रक्रिया या सर्व बाबी जोखमीच्या आहेत. याची दांपत्याला आणि मलाही जाणीव नव्हती.. टी बी, त्यात वजन कमी आणि गुंतागुंतीची मणक्याची शस्त्रक्रिया यांचा मेळ साधता साधता ‘वाडिया’ तील डॉक्टरांनाही तब्ब्ल तीन वर्षे लागली. आता जवळजवळ २ महिने साई वाडिया हॉस्पिटलमध्ये ट्रॅक्षण वर आहे.
शुक्रवारी 26 सप्टेंबर 2025 ला सकाळी सात वाजता ऑपरेशन ठेवलं आहे.. जोखीम आहे. काहीही घडू शकतं.. याची मला आणि आईवडिलांना डॉक्टरांनी जाणीव करून दिली आहे आणि जर शस्त्रक्रिया केली नाही तर पुढे त्याला जास्त बाक आल्यामुळे श्वास घेता येणार नाही असा धोक्याचा इशारा दिला..आता शस्त्रक्रियेचा खर्च चार लाखांच्या वर जातोय.. तो चार लाखांचा धनादेश मी मंगळवारी दि. 23 सप्टेंबर रोजी डॉक्टरांच्या हाती सुपूर्द करून आलो..
आता देवाच्या ( साईंच्या )कृपेची आणि आपल्या आशिर्वादाची आता गरज आहे.








