अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नव्या पोलीस निरीक्षकांनी कोतवाली परिसरांतील जनतेला दिला इशारा..!!
संभाजी पुरीगोसावी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून गणले जाणारे कोतवाली पोलीस ठाणेत नव्याने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अत्याचारांचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्यामुळे या रिक्त पदावर थेट पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची कोतवाली पोलीस ठाणेच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून. याबाबत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत आदेश काढला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी यापूर्वींच पारनेर,जामखेड तसेच पुणे,सातारा अशा जिल्ह्यातही विविध पोलीस ठाणेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, पारनेर वरून त्यांची पुणेत बदली झाली होती पुन्हा थेट अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आले होते. काही दिवसांपासून ते नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांची नियंत्रण कक्षात तात्काळ बदली करण्यात आली होती. यामुळे कोतवाली पोलीस ठाणेचा पदभार कोण स्वीकारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे कोतवाली पोलीस ठाणेला आता खमक्या अधिकारी मिळाल्याचे बोलले जात आहे. पोलीस निरीक्षकांनी पदभार घेताच कोतवाली पोलीस ठाणेच्या परिसरांतील जनतेला त्यांनी एकच आव्हान केले आहे की, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,*








