शहरातील महिलांना देवीच्या दर्शनासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू ते मंठा देवी दर्शन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळाचा गेल्या 25 वर्षांपासून चा स्तुत्य उपक्रम.
सेलू : नवरात्र व दुर्गा महोत्सवाचे औचित्य लक्षात घेऊन, शहरातील महिलांना देवीच्या दर्शनासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने मंठा येथील श्री जगदंबा माता दर्शन यात्रा द्वारे ,शहरातील महिलांना दर्शन घेण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे या वर्षी सुद्धा शनिवार २७ सप्टेंबर ते मंगळवार ३० सप्टेंबर दरम्यान मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे .माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा हा उपक्रम मागील अनेक वर्षापासून अविरतपणे सुरू आहे.शहरातील साईबाबा मंदिर परिसरातून सकाळी ०९ ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत सेलू ते मंठा व परत अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यात शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन देवी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .








