माहिती अधिकार दिन पंचायत समिती शिरूर येथे उत्साहात साजरा..
-यशोदा संस्थापक खंडूअण्णा गव्हाणे
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
२८ सप्टेंबर २०२५ या दिवशी सुट्टी असल्या कारणाने आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात आला त्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व प्रशासकीय कार्यालये तथा विभागीय आयुक्त-चंद्रकांत फुलकुंडवार, जिल्हाधिकारी-जितेंद्र डुडी,जिल्हा परिषद मुख्याधिकारी-गजानन पाटील यांचेकडून त्यांचे व त्यांच्या अधिनिस्त जिल्ह्यातील सर्व ई शासकीय निमशासकीय कार्यालयांना २८ सप्टेंबर २०२५ माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे
सदर शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/पत्र क्र.३७८/०८/सहा, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ निर्णया प्रमाणे पालन करण्या संबंधित अधिसूचना परिपत्रके संबंधित कार्यालयाने अवलंब केला.
माहिती अधिकार व येणाऱ्या अर्ज आपिले तसेच हर घर माहिती अधिकाराचा प्रचार प्रसार जनजागृती करणे तसेच माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे उपक्रम घेणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी असले कारणाने प्रत्येक जिल्ह्यात माहिती अधिकार या विषयी त्या त्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून शासनाने जिल्हाधिकारी यांच्यावर शासनाने सोपवलेली जबाबदारी असते त्यांनी केलेल्या सूचनेचे आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सष्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून पंचायत समिती शिरूर येथे साजरा केला. जीआर परिपत्रक अधिनिस्त कार्यालयास शासनाने २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून व सुचनेचे पालन करून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा. महेश डोके सहाय्यक गटविकास अधिकारी मा…. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी राम राठोड, गटशिक्षण अधिकारी कळमकर सर व इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी महिला बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत पार पाडला.
तसेच यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे. संस्थापक अध्यक्ष: श्री खंडूअण्णा भरत गव्हाणे माहिती अधिकार कार्यकर्ते सागर इसवे ज्ञानेश्वर जोरे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज पत्रकार सागर रोकडे पत्रकार अरुण कुमार मोटे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करून या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
गट विकास अधिकारी महेश ढोके यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून आपल्या अधिनस्त कार्यालयीन अधिकारी वर्गास माहिती अधिकार अधिनियम २००५ विषयी सविस्तर माहिती देऊन कायद्याचे गांभीर्य घेण्याचे व अर्ज आपिले स्वीकारून त्यावर योग्य असे निर्णय देण्याच्या सूचनाही केल्या. यशोदा संस्थापक खंडूअण्णा गव्हाणे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा निर्मिती रचना त्याचा सखोल अवलंब येणाऱ्या समस्या अडचणी अर्ज आपिले यांच्या वाढणाऱ्या संख्येवर उपाय व मार्गदर्शन तसेच यशोदा संस्थेच्या वतीने कायद्याचा उपक्रम घेऊन प्रचार प्रसार करत असल्याचे आपल्या वक्तव्यातून केले.
प्रास्ताविक मा. गटशिक्षण अधिकारी कळमकर सर यांनी मांडून सर्व आपल्याही अधिनस्त कर्मचारी वर्गास माहिती अधिकार याविषयी सखोल मार्गदर्शन केले सूचना आपल्या सभासनावेळी केले कार्यक्रमाचे आभार प्रस्तावना ग्रामविस्तार अधिकारी राम राठोड यांनी म्हणून माहिती अधिकार दिनाचे सर्व उपस्थितांचे स्वागत तसेच अधिकारी कर्मचारी वर्गास माहिती अधिकार कायदा व नियमाची संदर्भात तंतोतंत पालन करून संबंधित कार्यालय उपक्रमात जनजागृती करू पालन करण्याचे आश्वासन दिले.
निलेश वाळुंज यांनी शासकीय कार्यालय कायद्याचे गांभीर्य घेत नसून कलम ४ ख अपडेट करून सर्व रचना जनतेसमोर मांडावीत जेणेकरून अडचणी निर्माण होणार नाही. विस्तार अधिकारी यांनी उपस्थित आमचे आभार मानले व माहिती अधिकार दिन कार्यक्रमाची सांगता केली..!









