भावपूर्ण श्रद्धांजली श्रुतिक बाळा
वडनेर गेट परिसरात लष्करी हद्दीत देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या जवानाच्या दोन वर्षांच्या चिमुकल्या श्रुतिक गंगाधरचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
ही घटना ऐकून मन सुन्न झाले आहे. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. लहानग्या श्रुतिकच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना
श्रुतिक गंगाधर – केवळ दोन वर्षांचा,परंतु काळाने गाठले लवकर…
वडनेर गेट परिसरातील लष्कराच्या हद्दीत देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या एका जवानाच्या कुटुंबावर दुर्दैवाचा आघात झाला आहे.काल रात्री घरच्या अंगणात खेळत असताना,केवळ २ वर्षांचा चिमुकला श्रुतिक गंगाधर याला बिबट्याने ओढून नेले – ही घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे.
वनविभाग व लष्कराच्या संयुक्त शोध मोहिमेनंतर आज,साधारण दुपारी ३ वाजता,श्रुतिक सापडला,परंतु दुर्दैवाने तो आपल्यात राहिला नाही
ही घटना केवळ एका कुटुंबावरच नव्हे,तर संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
वनविभागाची झोप, निष्काळजीपणा आणि वेळेवर कारवाई न केल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो!
शहराच्या आसपास बिबट्यांचा वावर असूनही ठोस उपाययोजना का नाहीत माणसांच्या जीवावर उठणाऱ्या या घटनांना जबाबदार कोण?
आज श्रुतिक गेला. उद्या कोण चिमुकल्या श्रुतिकला भावपूर्ण श्रद्धांजली…देव त्याच्या निष्पाप आत्म्यास शांती देवो…आणि या दुःखी कुटुंबाला या अपार दुःखातून सावरण्याची शक्ती देवो
सामाजिक जबाबदारीने,आणि सुरक्षा यंत्रणांच्या जागृतीसाठी हा आवाज बुलंद करणे आज गरजेचे आहे.आपण सर्वांनी एकजूट होऊन या प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस भूमिका घेणे ही काळाची गरज आहे.
वनविभागाचा जाहीर निषेध!
शहराच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावले उचलावीत!









