महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
केशिका पुरकर, आकर्षण यादव, निलय पाटेकर व वरदान कोलते ला विजेतेपद.
सेलू : केशिक पुरकर चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १३ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या प्रथम मानांकित केशिका पुरकरने अंतिम फेरीत ठाण्याच्या सहाव्या मानांकन असलेल्या प्रिशा मलिकचा ११-२, १२-१४, १३-११, ११-६ असा ३-१ पराभव सुवर्ण पदक पटकावले. केशिकाने या मोसमातील चारही स्पर्धा जिंकून एक नवा इतिहास घडवला. १३ वर्षाखालील मुलांच्या गटात टीएसटीए मुंबईच्या आठवे मानांकन असलेल्या आकर्षण यादव ने पुण्याच्या दहावे मानांकन असलेल्या वरदान कोलते चा ११-२, ११-७, ११-८ असा एकतर्फी पराभव करून ३-० ने विजय मिळवून सुवर्णपदकावर कब्जा केला.११ वर्षाखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या तेरावे मानांकन असलेल्या आराध्या कोकणेने कोल्हापूरच्या समृद्धी मानवेकरचा ११-३, ११-३, ११-३ असा सहज ३-० ने सफाईदारपणे पराभव करून सुवर्ण पदक मिळविले. याच गटात मुलांच्या एकेरीत चौथ्या मानांकन असलेल्या पुण्याच्या वरदान कोलते ने मुंबईच्या युवान वालियाचा ११-६, १२-१०, ८-११, ११-९ असा ३-१ ने पराभव करून विजेतेपद पटकावून सुवर्ण पदकावर कब्जा केला. या स्पर्धेत वरदान कोलते ने एक सुवर्ण तर एक रजत पदक मिळविले.१५ वर्षाखालील मुलांच्या गटात ठाण्याच्या प्रथम मानांकित निलय पाटेकरने ठाण्याच्याच दुसऱ्या मानांकन असलेल्या प्रतीक तूलसानीचा अपेक्षेप्रमाणे १३-११, ११-५, ९-११, ११-२ असा ४-१ पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. १५ वर्षाखालील मुलींच्या गटात पुण्याच्या दुसऱ्या मानांकित नायशा नेवासकर ने ठाण्याच्या प्रथम मानांकित सानवी पुराणिकचा ११-६, १३-११, ११-७ असा सहज पराभव करून या स्पर्धेतील दुसरे सुवर्ण पदक पटकावले.स्पर्धेचा बक्षीस वितरण प्रसंगी नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीणजी लुंकड, जनरल सेक्रेटरी यतिन टिपणीस, कोषाध्यक्ष संजय कडू, कार्यकारिणी सदस्य शेखर भंडारी, महेंद्र चिपळूणकर, अशोक राऊत, गणेश माळवे, जिल्हा कोषाध्याक्ष अभिषेक छाजेड, रा्ट्रीय प्रशिक्षक संजय मोडक आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रविण लुंकड व यतीन टिपणीस यांनी राज्य संघटनेच्या वतीने मनोगत व्यक्त करून नाशिक जिल्हा संघटनेचे या स्पर्धा उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. प्रस्ताविक नरेंद्र छाजेड यांनी केले या प्रसंगी विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. सिमा कर्पे यांनी केले.








