एरंडोल नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी पूरग्रस्त भागात केली मोलाची कामगिरी
विशेष प्रतिनिधी. स्वप्नील पाटील.एरंडोल
कासोदा उतरण भागामध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे अंजनी धरण भरल्याने. दि. 22/9/ 2025 रोजी अंजनी धरणातून 5000.क्युसेक पेक्षा जास्त पाणी विसर्गकारण्यात आले. त्यामुळे एरंडोल शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे पूरग्रस्त परस्थिती निर्माण झाली. एरंडोल शहराच्या कासोदा नाका. आठवडे बाजार परिसर. तसेच फकीर वाडा केवडीपुरा या भागात अंजनी नदीचे पाणी शिरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी. श्री अमोल बागुल साहेब हे स्वतः संपूर्ण नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत पाहणी करत नागरिकांना मदत केली. व अंजनी नदी काठचे संपूर्ण परिसर कासोदा दरवाजा,फकीर वाडा,आठवडे बाजार ,मरिमाता मंदिर,केवडीपुरा या भागात कर्मचाऱ्यांनी नागरिकांना पाण्याच्या पुरा पासून नागरिकांचे कोणतेकी नुकसान होऊ नये या साठी घरोघरी जाऊन नागरिकांना सहकार्य करून बाहेर काढले.तसेच ज्या भागांमध्ये पुराचे पाणी शिरले व घरांचे नुकसान झाले अशा नागरिकांना डी.डी.एस.पी. कॉलेज या ठिकाणी सर्व नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली.तसेच पूरग्रस्त भागात घरोघरी जाऊन.फूड पॅकेज.( जेवण) वाटप करण्यात आले. व कासोदा नाक्या जवळील कुटुंबा साठी चौधरी मंगल कार्यालयात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली. दुपारी 12 वाजे पासून मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न.पा. चे आपती व्यवस्थापन टीम ने मोलाची कामगिरी केली. या बाबत नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं आहेत…









