एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

विदर्भाचे हृदय धोक्यात

विदर्भाचे हृदय धोक्यात – वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सर्व्हेतून धक्कादायक निष्कर्ष : मध्यमवयीन आणि तरुण रुग्णांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका, उपचारासाठी उशिरा पोहोचल्याने रुग्णाची वाचण्याची शक्यता कमी

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर


नागपूर, 25 सप्टेंबर 2025: जबाबदार कॉर्पोरेट म्हणून वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांनी नागपूर व आसपासच्या भागातील डॉक्टरांमध्ये एक महिन्याचे हार्ट हेल्थ इन्साईट्स सर्व्हेक्षण केले. यात कार्डिओलॉजिस्ट, जनरल प्रॅक्टिशनर्स आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स (आरएमओ) सहभागी झाले. या सर्व्हेमुळे मध्य भारतातील हृदयविकाराशी संबंधित आव्हानांचे संपूर्ण चित्र समोर आले.
या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष चिंताजनक आहेत: हृदयरोग आता फक्त वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बहुतांश डॉक्टरांच्या मते 41 ते 60 वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त आहे, तर अनेकांनी 30 वर्षांच्या आसपासच्या तरुणांमध्येही हृदयरोगाचे प्रकरणे वाढल्याचे नमूद केले.
दहा वर्षांपूर्वी नागपूरमध्ये 30 वर्षांच्या रुग्णांना हृदयरोग होताना पाहणे दुर्मिळ होते. पण आज तणावपूर्ण नोकऱ्या, चुकीची जीवनशैली आणि वेळेवर तपासणी न केल्यामुळे तरुण रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. हा एक मोठा इशारा आहे,” असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉ. नितीन तिवारी यांनी सांगितले.
सर्व्हेक्षणात दिसून आले की हृदयाची प्रतिबंधात्मक तपासणी अजूनही होत नाही. अनेक डॉक्टरांनी सांगितले की रुग्ण फक्त लक्षणे दिसल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये येतात, तर प्रतिबंधात्मक तपासणीसाठी येणे अगदी कमी आहे.
“आजच्या स्पर्धात्मक वातावरणात, कामाच्या ठिकाणी असो वा घरात तरुणांवर प्रचंड ताण असतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो,” असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सिनियर सीव्हीटीएस सर्जन डॉ. सुमित नारंग यांनी सांगितले.
“शहरीकरण, बसून काम करण्याची सवय, पोटाभोवती वाढलेली चरबी, आहारातील बदल, वाढते प्रदूषण, ताण, अपुरी झोप, लवकर सुरू होणारा मधुमेह आणि आनुवंशिक कारणे हे सर्व घटक भारतीय रुग्णांमध्ये कमी वयात हृदयरोग होण्यास कारणीभूत ठरत आहेत,” असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिनेश पडोळे यांनी सांगितले.
“रुग्णांना प्रतिबंधात्मक तपासणीची सवय अजूनही नाही. रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचेतोवर उपचाराचा सुवर्णकाळ निघून जातो. जागरूकता आणि वेळेवर तपासणी हीच खरी गरज आहे,” असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमित बल्लमवार यांनी सांगितले.
आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे जागरूकतेचा अभाव. दोन-तृतीयांशाहून अधिक डॉक्टरांनी सांगितले की रुग्णांना स्वतःचा रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि साखरेची पातळी याची पूर्ण माहिती नसते. अर्ध्याहून अधिक डॉक्टरांनी असेही पाहिले की रुग्ण हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे जसे की, छातीत दुखणे, घाम येणे किंवा श्वास घेणे अवघड होणे ओळखू शकत नाहीत.
हे सर्व्हेक्षण नागपूरमधील प्रत्यक्ष परिस्थिती दाखवतो. जागरूकता, वेग आणि उपचारांची उपलब्धता हे तीन महत्वाचे घटक आहेत. वोक्हार्टमध्ये आम्ही डॉक्टर, समाज आणि माध्यमांच्या मदतीने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विदर्भातील रुग्णाचे आरोग्य सुधारणे ही आमची जबाबदारी मानतो,” असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सेंटर हेड रवी बागली यांनी सांगितले.
संपूर्ण सर्व्हेक्षणात पश्चिम भारतातील मुंबई शहर, एमएमआर, राजकोट आणि नागपूर यांचा समावेश होता आणि येथील सुमारे 326 डॉक्टरांनी सहभाग घेतला. यापैकी 48 डॉक्टर नागपूरचे होते आणि हा रिपोर्ट त्यांच्या मतांवर आधारित आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेड बद्दल:
वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेड हा तृतीयक काळजी (टर्शियरी केअर) सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, ज्यात नागपूर, राजकोट, साउथ मुंबई आणि नॉर्थ मुंबई येथे सुविधा आहेत. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक मानकांच्या प्रक्रिया पद्धतींसाठी ओळखले जाणारे वोक्हार्ट हॉस्पिटल्स सुरक्षा आणि दर्जेदार उपचार यास प्राधान्य देते. रुग्णांचे जीवनमान सुधारणे आणि उत्तम आरोग्य देणे हे या हॉस्पिटलचे मुख्य तत्त्वज्ञान आहे, ज्यामुळे ते देशातील काही व्यावसायिकपणे व्यवस्थापित कॉर्पोरेट हॉस्पिटल पैकी एक बनले आहे.
सर्व्हेक्षणातील निष्कर्ष (वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथील डॉक्टरांचे मत)
1. गेल्या वर्षी हृदयरोग रुग्णांमध्ये लिंग वितरण कसे राहिले:
• 70% पेक्षा जास्त डॉक्टरांनी सांगितले की हृदयरोग मुख्यतः पुरुषांमध्ये आढळतो.
टिप्पणी: पुरुष जास्त संवेदनशील आहेत, तरी महिलांमध्येही हृदयरोग वाढत आहे.
2. सर्वात प्रभावित वयोगट:
• 80% पेक्षा जास्त डॉक्टरांनी सांगितले की मध्यमवयीन (41-60 वर्षे) रुग्ण सर्वाधिक आहेत.
• काहींनी ज्येष्ठ (60+) रुग्ण यांचाही उल्लेख केला.
टिप्पणी: मध्यमवय हा सर्वात जोखमीचा वयोगट आहे, ज्येष्ठ नागरिकांनाही धोका आहे.
3. गेल्या 5 वर्षांत 40 वर्षांखालील रुग्णांमध्ये हृदयरोग वाढला आहे का:
• बहुसंख्य डॉक्टरांनी सांगितले की या गटात रुग्णसंख्या लक्षणीय किंवा किंचित वाढली आहे.
टिप्पणी: डॉक्टरांना स्पष्टपणे तरुण रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते.
4. हृदयरोगाची मुख्य कारणे:
• जवळपास सर्व डॉक्टर म्हणाले की – ताण, बसून काम करणे, अयोग्य आहार, धूम्रपान आणि मधुमेह ही मुख्य कारणे आहे.
टिप्पणी: नागपूरमधील हृदयरोग जीवनशैली आणि चयापचय यासंबंधी घटकांमुळे होतो.
5. रुग्ण तपासणीसाठी केव्हा येतात?:
• बहुसंख्य डॉक्टर म्हणाले की रुग्ण बहुतेक वेळा फक्त लक्षणे दिसल्यानंतर येतात.
टिप्पणी: नागपूरमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्याबद्दल जागरूकता अजूनही खूप कमी आहे.
6. रुग्णांना त्यांच्या रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि शुगर लेव्हल बद्दल किती माहिती आहे?
• बहुसंख्य डॉक्टर म्हणाले अर्धवट माहिती असते.
टिप्पणी: रुग्ण अनेकदा अर्धवट माहितीवरच अवलंबून असतात, जे हृदयाच्या आरोग्यास धोका ठरते.
7. आपत्कालीन स्थितीत रुग्ण लवकर रुग्णालयात पोहोचतात का?
• बहुसंख्य डॉक्टर म्हणाले “कधी कधी” किंवा “दुर्लक्षनीय” वेळेसच रुग्ण पोहोचतात.
टिप्पणी: उशीर झाल्यामुळे जीव वाचण्याची संधी कमी होते.
8. रुग्ण हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांना किती ओळखतात:
• बहुसंख्य म्हणाले जागरूकता अर्धवट आहे, काहींनी कमी असल्याचे सांगितले.
टिप्पणी: अनेक रुग्ण छातीत दुखणे किंवा घाम येणे याला हृदयविकाराशी संबंधित मनात नाहीत, जे धोकादायक ठरू शकते.
9. हृदयरोगाच्या वेळेवर उपचारात अडथळे कोणते आहेत:
• अनेक डॉक्टरांनी आर्थिक किंवा सुविधा संबंधित अडथळे नमूद केले; काहींनी हृदयविकार उशीरा ओळखणे आणि आपत्कालीन प्रतिसाद कमी असल्याचे सांगितले.
टिप्पणी: नागपूरमध्ये आर्थिक समस्या आणि जागरूकतेची कमी असल्यामुळे उपचार उशिरा होतात..
10. हृदयरोग कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय:
• जीवनशैलीत बदल (आहार, व्यायाम, तंबाखू टाळणे).
• इतर: नियमित प्रतिबंधात्मक तपासणी आणि सुधारित सुविधा.
टिप्पणी: डॉक्टरांचे म्हणणे आहे की प्रतिबंध हेच दीर्घकालीन उपाय आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link