अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अध्यक्षपदी शामराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सर्वानुमते ही निवड जाहीर करण्यात आली.
पुणे सहसंपादक : गणेश महाडिक जेजुरी
जेजुरी शहर,ता 24: अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अध्यक्षपदी शामराव जगताप यांची निवड करण्यात आल्याची घोषणा अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर यांनी केली.
जेजुरी येथे ट्रस्टच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही निवड करण्यात आली. अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेश महिला अध्यक्षा सुजाता गुरव, संस्थापक खजिनदार इजाज पानसरे, संस्थापक सदस्य दत्ता सूर्यवंशी, राहुल भोंडे,पुणे जिल्हा महिला अध्यक्षा राणी भंडलकर, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समिर मुलाणी,जेजुरी नगरपरिषदच्या माजी उपनगराध्यक्ष साधनाताई दीडभाई नगरसेवक गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जरांडे,सचिन कुंभार,जेजुरी शहर महिला अध्यक्षा मयूरी जराडे,उपाध्यक्ष दिपाली कुंभार, रेणुका गद्याळ ,सचिव योगिता मोरे,कविता भोंडे, खजिनदार सुषमा शिंदे, कार्याध्यक्ष मंगल उबाळे, ज्येष्ठसल्लागार अंजली कदम,हर्षली चौधरी, सरचिटणीस शलाका मोरे,संघटक राजश्री कदम,सदस्य सविता उबाळे, कल्याणी कदम, उज्वला जेजुरीकर, हेमा प्रधान, अनिता कर्डिले, मीरा हजारे,रेखा लाखे, रेशमा मोरे, मंदा कापसे, हेमा कदम, सुरेखा हिरेमनी, आदी उस्थितीत होते.









