२८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणे बाबत दिले निवेदन
विशेष प्रतिनिधी .स्वप्निल पाटील जळगाव
प्रतिनिधी – एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे दि.२८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी शहरातील प्रमुख कार्यालय प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना देण्यात आले.
निवेदनात महाराष्ट्र शासन नियमानुसार माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असल्याचे म्हटले आहे व त्याचा प्रसार प्रचार करणे शासनाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.या कायद्याची उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी व सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय अस्थापणा म्हणून आपली जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने देखील यादिवशी प्रत्येक शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय असल्याचे म्हटले आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष सिताराम मराठे,तालुका उपाध्यक्ष तुषार शिंपी,संपर्क प्रमुख नितीन ठक्कर,सक्रिय सभासद राजधर महाजन,प्रचार संयोग प्रा.आर.एस.निकुंभ,प्रचार समन्वयक विज्ञान पाटील,सहप्रचार समन्वयक ,प्रभाकर महाजन,सक्रिय संघटक राहुल महाजन,सहप्रचार,भुषण चौधरी, निलेश चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.








