जालन्यात धनगर समाजाचा एल्गार एसटी आरक्षण अंमलबजावणीचा निर्धार
देवा भाऊ धनगर समाज पुछता है क्या हुआ तेरा वादा 100 कॅबिनेट से हुए जादा आंदोलनात झळकले बॅनर
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
जालना येथे धनगर आरक्षण संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे हे गेल्या काही दिवसापासून अंबड चौफुली येथे उपोषणास बसलेले आहेत . परंतु शासनाचा एकही प्रतिनिधी येऊन त्याने भेट दिलेली नाही .या सरकारला अद्यापही जाग आलेली नाही त्यामुळे जालना शहरांमध्ये धनगरी एसटी आरक्षणामलबजावणीसाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात आंदोलकांनी येळकोट येळकोट जय मल्हार एसटी आरक्षण अंमलबजावणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची एकच मिशन धनगर आरक्षण आशा घोषणांनी जालना शहर दुमदुमून गेले होते .देवा भाऊ आणि भाजप सरकारला त्यांनी 2014 साली दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी जालना शहरात विराट महामोर्चा झाला या मोर्चाची सुरुवात गांधी चमन ते अंबड चौफुली पर्यंत विराट महामोर्चा झाला या मोर्चामध्ये सकल धनगर समाजाचे मेंढपाळ बांधव आपल्या मेंढ्या घेऊन आले होते .धनगर समाज बांधवांनी गळ्यात पिवळे रुमाल आणि पिवळे फेटे घालून मोर्चामध्ये सहभागी झाले होते .
धनगर एसटी आरक्षण अमलबजावणी झाल्याशिवाय मागे हा टनार नाही हा पवित्रा दीपक भाऊ बोराडे यांनी घेतला आहे गेल्या अनेक वर्षापासून भाजप सरकार आणि देवेंद्र फडवणीस हे धनगर समाजाला फसवत आहेत इथून पुढे ही फसवीगिरी खपवून घेतल्या जाणार नाही .एसटी आरक्षण पदरात पाडून घेण्याची हीच ती आता वेळ आहे गोरगरीब धनगर बांधवांनी जागे होऊन हा लढा आपल्याला यशस्वी करावा लागणार आहे . आता समाजाच ह्या भाजप सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही .येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या निवडणुका ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,नगरपरिषद महानगरपालिका या निवडणुकीमध्ये भाजप सरकारला मतदान करू नये हे सरकारसत्तेवर येते तेव्हा धनगरी एसटी आरक्षण अमोल बजावणी करण्याचे आश्वासन देते आणि दिलेले आश्वासन कुठलेही पूर्ण करत नाही यामुळे धनगर समाज सरकारवर नाराज आहे .
आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असा ठाम निर्धार धनगर आंदोलन दीपक बोराडे यांनी घेतला आहे धनगर आणि धनगड एकच असून असा शासन निर्णय (जीआर )तातडीने शासन जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असे धनगर एसटी आरक्षण ण अमलबजावणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांनी स्पष्ट सांगितले आहे आरक्षणासाठी दीपक बोराडे यांनी अंबड चौफुली येथे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलन विराट मोर्चा साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जालना येथे चमन जवळ आंदोलक दाखल झाले होते .
कॉलम
जालना चमन जवळ आणि पालिका रेल्वे स्थानकात तुफान गर्दी
धनगरी एसटी आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो धनगर बांधव जालन्यात धडकल्याने रेल्वे स्थानक परिसरात व पालिका परिसरात अक्षरशः धनगर आंदोलकांची छावणीच पडली अंबड चौफुलीवर धनगर बांधवां नी प्रचंड गर्दी झाल्यामुळे परिसरातील रस्ते आणि रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येने धनगर आंदोलकांनी स्थान मानले होते धनगरी एसटी आरक्षणासाठी हजारो आंदोलन आल्यामुळे संपूर्ण परिसरात गर्दी झाली होती अंबड चौफुलीवर पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे परिसरातच आंदोलकांनी उपलब्ध जागेत आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणाबाजींनी सरकारला धारेवर धरले शेकडो आंदोलन या ठिकाणी ठाण मांडून बसले होते .
.









