राज्यभरात शिक्षक भरतीला गती देणे आणि १००% रिक्त जागा भरण्यासाठी निवेदने
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्रच्या वतीने अमरावती, जालना, सातारा , नागपूर, भंडारा , गडचिरोली अश्या सर्व जिल्ह्यातील विविध शिक्षणाधिकारी , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मतदार संघातील आमदार आणि मंत्र्यांना शिक्षक भरती 2025 पात्र अभियोग्यता धारकांकडून विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात शिक्षक भरती प्रक्रिया जुन्या संच मान्यतेनुसार तात्काळ सुरू करावी. “एक व्यक्ती (पद) – एक बिंदू” या तत्त्वानुसार भरती प्रक्रिया राबवावी. पवित्र पोर्टलवरील मागील चुकांची पुनरावृत्ती टाळून भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करावी, या मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी जालना श्रीमती संगीता भागवत , माध्यमिक शिक्षणाधिकारी जालना श्री बाळासाहेब खरात , मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जालना श्रीमती मिन्नू पी. एम. तसेच राज्येभरात विविध ग्रामपंचायत यांना निवेदने देण्यात आली. हे निवेदन देताना जालना जिल्ह्यातून प्रवीणकुमार दवंडे , सुमित जोशी, मुक्ताराम शेळके , विठ्ठल राठोड , इंद्रजित गुंजाळ , दत्तात्रय काकडे, शोभा राठोड , रामेश्वर तळेकर , शेख मसुद , शेख तोफीक हे उपस्थित होते.
_”TAIT 3 भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी व जुन्या संच मान्यतेनुसार 100% वर्ग 1 ते 12वी च्या जागा द्याव्यात , तसेच गरीब मुलांच्या हक्काच्या मराठी जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी सरकारला आमची कळकळीची विंनती .” —— प्रविणकुमार दवंडे_








