एरंडोल महाविद्यालयात महसूल पंधरवाड्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप कार्यक्रम संपन्न
विशेष प्रतिनिधी..स्वप्निल पाटील जळगाव
एरंडोल- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल आणि तहसील कार्यालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवड्या (सेवा पंधरवाडा) निमित्त विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशभर 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा केला जात आहे. त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मा. अमित दादा पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी मा. श्री. मनीषकुमार गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एरंडोल तालुक्याचे तहसीलदार मा.श्री. प्रदीप पाटील यांनी केले. यात त्यांनी हा पंधरवाडा देशभर का साजरा केला जातो याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तत्पूर्वी तहसील कार्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना लागणारे विविध कागदपत्रे जसे की, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर इत्यादी कागदपत्रे सर्व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले, याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केले.
प्रमुख अतिथी मा.मनीषकुमार गायकवाड यांनी प्रमाणपत्रे काढताना आपण आपले सरकार या पोर्टलच्या वापर करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. व सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने वापराव्यात असे सांगितले. सदरील कार्यक्रमासाठी माननीय प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व तहसील कार्यालयाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी मदत केली त्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे अध्यक्ष मा.अमितदादा पाटील यांनी महसूल पंधरवड्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व दाखले वाटपाची परंपरा यापुढे देखील तहसील कार्यालयाने सुरु ठेवावी याची विनंती केली व आलेल्या सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले.
सदरील कार्यक्रमासाठी एरंडोल तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मा. श्री.संजय घुले, नायब तहसीलदार श्री.दिलीप पाटील, तलाठी श्री. सागर कोळी, सेतु संचालक श्री. विशाल पाटील हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना काळे मॅडम यांनी केले तर आभार प्रा. डॉ. अतुल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. डॉ. आर. एस. वानखेडे, प्रा. सुनील सजगणे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सोपान साळुंखे यांनी मेहनत घेतली.








