अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अखेर जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या तिन्ही शाळेतील शिक्षकांच्या गैर नियुक्तीचे प्रकरण एस.आय.टी.कडे
ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश
संपादक संतोष लांडे
नांदेड- जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेच्या नरसिंह विद्यामंदिर उमरदरी, शिवाजी विद्यालय सिडको नांदेड व नरसिंह विद्यामंदिर महावीर सोसायटी नांदेड या तिन्ही शाळेतील सन २०१२ नंतरच्या झालेल्या गैर नियुक्त्यांच्या चौकशीचे प्रकरण शिक्षण संचालकाकडून विशेष चौकशी पथकाकडे (एस.आय.टी.) वर्ग केल्यामुळे जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश आले.
या चौकशीतून नांदेडच्या शिक्षण भरतीचे बरेच गैर कारभार उघडकीस येतील म्हणून शिक्षण विभागाचे व तत्कालीन संस्था अध्यक्ष व शिक्षकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेच्या नरसिंह विद्यामंदिर उमरदरी, शिवाजी विद्यालय सिडको नांदेड व नरसिंह विद्यामंदिर महावीर सोसायटी नांदेड या तिन्ही शाळेत सन २०१२ नंतर शिक्षक भरती बंद असताना तत्कालीन संस्था अध्यक्षांनी १५ ते २० शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या विनाअनुदान तत्त्वावर केल्या. त्यात प्रामुख्याने संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव यांचा मुलगा व सुनबाई (नवरा बायको) यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. सन २०१५ नंतर संस्थेची कार्यकारणी संपुष्टात आली व पुढे या कार्यकारणीस धर्मादाय उपायुक्त नांदेड यांचेकडून मान्यता मिळाली नाही. पण सण २०१७ नंतर तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी मुलगा व सुनबाई सह इतरही पंधरा ते वीस शिक्षकांचे विनाअनुदानित वरून अनुदानित वर नियमबाह्य बदल्या केल्या. या बदल्यास कार्यकारणीचे तोतया उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव तसेच डॉ. अश्विन कुमार क्षीरसागर, सूर्यवंशी एस.एम. या तोतया सदस्यांनी ठराव दिलेत व या बनावट व बोगस प्रस्तावाला तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी मंजुरी दिली. मंजुरीनंतर हे प्रस्ताव शालार्थ आयडी साठी शिक्षण उपसंचालक लातूर यांचे कडे गेल्यावर त्यांनी पण या नियमबाह्य नियुक्ती केलेल्या सर्व शिक्षकांच्या शालार्थ आयडी मंजूर करून २० टक्के अनुदान मंजूर केले. पण संबंधित शिक्षकांना तोतया अध्यक्ष, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, तत्कालीन वेतन पथक चे अधीक्षक व तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी २० टक्के मंजुरी असलेल्या शिक्षकांना शंभर टक्के वेतन देण्यास सुरुवात केली. व या शिक्षकांचे मागील वेतनाचा फरक शंभर टक्के प्रमाणे देऊन लाखो रुपयाने वाटला. तर काही शिक्षकांना तोतया अध्यक्ष शिवाजी जाधव, तोतया उपाध्यक्ष रवी जाधव यांनी मुख्याध्यापक पदावर पदोन्नत्या दिल्या. त्यासाठी तोतया उपाध्यक्ष रवी जाधव,डॉ.अश्विन क्षीरसागर यांनी बोगस ठराव दिलेत.व यांचे मुख्याध्यापक पदाचे वेतन काढून शासनाला करोडो रुपयाला लुटले. याची तक्रार सखाराम कुलकर्णी यांनी २०२१ पासून शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्याकडे करत होते. पण याची चौकशी करण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत होते. कारण या गैरनियुक्त्यामध्ये शिक्षणाधिकारी सह वरीष्ठ या भ्रष्ट कारभारात सहभागी असल्यामुळे ते चौकशीच करत नव्हते. उलट तोतया अध्यक्ष जाधवांना सांगत होते की कुलकर्णीचा काहीतरी बंदोबस्त करा. नंतर तोतया अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कुलकर्णीवर खंडणीचे व इतर खोटे- नाटे व बिनबूडाचे आरोप करण्यास सुरुवात केली. कुलकर्णी या खोट्या आरोपांना न डगमगता गैरप्रकारची चौकशी करण्याचे पाठपुरावे करत प्रयत्न चालूच होते. शेवटी शासनाने महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन केले. यामुळेच ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुळकर्णी यांचे प्रलंबित असलेले व सर्व पुराव्यासह असलेले जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील शिक्षकांच्या गैर नियुक्तीचे प्रकरण शिक्षण संचालकांनी एस.आय.टी कडे वर्ग केले. व या प्रकरणात शिक्षण संचालक यांनी शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांचे सोबत नुकतीच बैठक घेऊन आढावा घेतला.कुलकर्णी यांना या प्रयत्नांना यश आले.या चौकशीमुळे सर्व शिक्षकांमध्ये शिक्षण विभागामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.








