एक हात मदतीचा धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान, आरोग्यसेना संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हाप्रमुख केदारजी दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधे वाटप करण्यात आली
प्रतिनिधी मुकूंद मोरे
धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आणि शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सन्माननीय शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री केदारजी दिघे यांच्या मदतीने,आज मंगळवार दि.२३ सप्टेंबर,२०२५ रोजी कल्याण येथील कर्कग्रस्थ ३६ वर्षीय रुग्ण महिलेस धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतीष्ठान यांच्या मार्फत आर्थिक
तसेच शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा यांच्या मार्फत औषधांची मदत करण्यात आली,कर्करोगाने ग्रासलेले या तरुणीस कल्याण येथील साई संजिवनी क्रिटीकेअर रुग्णालय येथे दाखल केल्याचे श्री.केदारजी दिघे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा च्या टीमला सदर रुग्णालयात रुग्णाच्या तब्येतीची चौकशी तसेच सर्वोत्परी मदत करण्यास सांगण्यात आले.शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर , महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. जितेंद्र दादा दगडु सकपाळ, यांच्या मार्गदर्शनाने,ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत भुईंबर ठाणे जिल्हा समन्वयक श्री एकनाथ अहिरे, कल्याण जिल्हा सह समन्वयक श्री अजित माने, कल्याण ग्रामिण विभागीय समन्वयक श्री.संजय निकम,श्री.नितीन सावंत, श्री.राजेंद्र शिसैकर तसेच शिवसेना शाखाप्रमुख श्री.भास्कर शिर्के यांनी ताबडतोब रुग्णालयात जाऊन रुग्णाची चौकशी करुन रुग्णास आर्थिक तसेच औषधे स्वरुपात मदत करुन पुढील उपचारासाठी सर्वोत्परी मदत करण्याचे आश्वासीत करण्यात आले,

रुग्णाने आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवसेना उद्धजी ठाकरे पुरस्कृत शिव आरोग्य सेना आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व श्री केदारजी दिघे यांचे मनःपुर्वक आभार मानले









