आय.आय.टी. मुंबई येथील प्रकल्प देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका शिक्षण संस्थेची २,४६,००,०००/- रुपयांची अर्थिक फसवणुक करणा-या इसमास हैद्राबाद येथून पुणे पोलिसांनी केली अटक.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेला गुन्हा रजि. नं ९६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१९ (२), ३१८ (४), ३१६ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) या दाखल गुन्ह्यामध्ये Bombay IIT येथील प्रतिष्ठीत प्रोफेसरचे नाव वापरुन शासनाचे AI व Drone प्रकल्प देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना वारंवार मेल व व्हॉट्सअॅप कॉलव्दारे त्यांची दिशाभूल करुन त्यांना पैसे भरण्यास भाग पाडुन फिर्यादी प्रोफेसर असलेल्या पुण्याच्या नामांकीत Engg. College ची एकूण २,४६,००,०००/- रुपयेची आर्थिक फसवणुक केली म्हणून सदरचा गुन्हा दिनांक ०६सप्टेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचे तपा अधिकारी वपोनि स्वप्नाली शिंदे यांनी दाखल गुन्ह्याचा सखोल तपास केला तसेच गुन्ह्यातील मिळुन आलेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणद्वारे यातील फिर्यादी यांच्या विद्यापीठाची एकूण २,४६,००,०००/- रू रकमेची आर्थिक फसवणूक करणा-या व्यक्तीचे नाव हे Bombay IIT येथील प्रोफेसरचे नसून ते सितैया किलारु, वय ३४ वर्षे, रा. मेहेर रोड, याप्रल, हैद्राबाद तेलंगणा (Seetaiah Kilaru, Address Meherr Road, yepral, Hydrabad Telangana) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर नमुद गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेण्यासाठी दि. १८सप्टेंबर २०२५ रोजी वपोनि स्वप्नाली शिंदे व सायबर पोलीस पथक हैद्राबाद येथे रवाना झाले. हैद्राबाद येथे गुन्ह्याच्या तपासात वर नमुद आरोपीस दि. २१सप्टेंबर २०२५ रोजी आरोपीचा शोध घेण्या करीता साई नगर, प्रगती नगर, निजामपेठ, गच्चीबावली, याप्रल याठिकाणी कसून शोध घेतला असता तो याप्रल, हैद्राबाद येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सापळा रचून त्यास शिताफिने पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता तो स्वतः गुन्ह्याचा Mastermind असल्याची खात्री पटल्याने त्यास अटक केली.
सदर आरोपीकडून आत्तापर्यंत १० डेबीटकार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, एक ०५ जी सीमकार्ड, सोने खरेदी पावत्या, इतर कागदपत्रे, ७० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल, ०१ टॅब, ०१ लॅपटॉप, १,०५,०००/- रूपये रकमेचे पिवळ्या धातुचे दागिने, तसेच ४० लाख रुपये किमतीची एक टोयोटा इनोव्हा कार व ८ लाख रुपये किमतीची एक किया सोनेट कार असा मुद्देमाल (एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपीचा हैद्राबाद न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यास पुणे येथे आणण्यात आले असून मा. न्यायालयाने आरोपीची दि. २८सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री पंकज देशमुख (गुन्हे) मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर श्री विवेक मासाळ मा. पोलीस उप-आयुक्त (पोलीस मुख्यालय) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे श्री. मच्छिंद्र खाडे, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता देवकाते, पोलीस अंमलदार संदिप मुंढे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोडे, संदिप कारकूड, म. पोलीस अंमलदार टिना कांबळे, पोलीस अंमलदार अमोल कदम, सचिन शिंदे, गंगाधर काळे, अदनान शेख, सतिश मांढरे, कृष्णा मारकड, म.पो. अंमलदार सुप्रिया होळकर या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.
सदर आरोपी हा सराईत आरोपी असुन त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सायबर पोलीस ठाणे हैद्राबाद येथे.
০৭) CR no 280/2024 IPC 420 IT Act 66(D)
(०२) CR no 508/2024 IPC 420 IT Act 66(D)
(०३) CRno 1335/2024 IPC 420 IT Act 66(D)
(०४) CRno 3453/2024 IPC 419, 420 IT Act (D)
सायबर क्राईम पोलीस ठाणे तेलंगणा येथे
(०१) CR no 545/2024, IPC 420
(०२) CR no 26/2023, IPC 420, 419 गचीबोवली पोलीस ठाणे तेलंगणा येथे
(०१) CR no 1282/2025 BNS 316 (2),318 (4) मेडीपली पोलीस ठाणे तेलंगणा येथे
(०२) CR no1276/2025 IPC BNS 318(4), 316 (2) असे वरील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत
आरोपी बाबतची माहिती पुढील प्रमाणे
१) आरोपी मुळचा विजयवाडा मधील असून सध्या हैद्राबाद येथे वास्तव्याला आहे.
२ ) आरोपी हा उच्च शिक्षित असून २०१० मध्ये ई.एन.टी.सी. इंजिनियर
३) सन २०१० ते सन २०१४ मध्ये स्टॅफोर्डशाईर युनिर्व्हसिटी, लंडन, यु.के. येथे ई.एन.टी.सी मध्ये मास्टर डिग्री तसेच ब्रिमिंगहम युनिव्र्व्हसिटी, लंडन, यु.के येथे ई.एन.टी.सी मध्ये पी.एच.डी. केली आहे.
४) सन २०१५ ते सन २०१६ कोनेरु युनिर्व्हसिटी हैद्राबाद येथे नोकरी केली.
५) सन २०१६ ते सन २०१८ बी.आर.आय.टी. युनिर्व्हसिटी हैद्राबाद येथे नोकरी केली.
६) सन २०१९ व सन २०२० मध्ये यु.पी.एस.सी. पुर्व व मुख्य परिक्षा पास
७) सन २०२१ मध्ये ऑनलाईन टिचींग यु.पी.एस.सी. प्रिप्रेशन बाबत.
८) सन २०२२ पासून कौटुंबिक वाद झाल्यावर कुठेही जॉब करीत नाही.
या प्रेसनोट व्दारे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर हे जनतेस शेअर ट्रेडिंग मध्ये जास्त परताव्याचे आमिष, अटकेची भिती, पार्सल मध्ये ड्रग्ज, इलेक्ट्रीसीटी गॅस कनेक्शन बंद होईल, ऑनलाईन बँक केवायसी अपडेट अशी प्रलोभने व धमक्यां प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीबाबत एन.सी.आर.पी. पोर्टल https://cybercrime.gov.in, 1930, 1945 यावर संपर्क साधून नजिकच्या पोलीस ठाण्यात/सायबर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा जेणेकरुन आपली फसवणूक टाळता येईल तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यावर मोठी रक्कम ट्रान्सफर करताना बँकेचे खाते क्रमांक, धारकाचे नाव, बँक शाखेचे नाव इ. बाबत खात्री करावी असे आवाहन करीत आहे.









