गांजा विक्रीकरणा-या इसमास गांजा व मुद्देमालासह वाणवडी पोलिसांनी केली अटक
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
वाणवडी :दि.२३सप्टेंबर २०२५ रोजी वानवडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व स्टाफ है वानवडी पोलीस ठाच्या हद्दीमध्ये गस्ती वर असताना, तपास पथकाचे पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले व अमोल गायकवाड यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एक काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटार सायकलवर गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगरकडे जाणाऱ्या रोडवरील पुलावर संचयितरित्या एक इसम थांबला असुन त्याच्या कडे असलेल्या सँगबॅगमध्ये काहीतरी संशयित सामान आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळवाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन टिम करुन बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करुन बातमीतील वर्णनाचा इसम हा गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ, वानवडी, पुणे, नेताजीनगरकडे जाणा-या रोडलगत अंधाराचा सहारा घेऊन संशयास्पदरित्या एक सँगबॅग घेवुन मोटार सायकलवर कोणाची तरी वाट बघत थांबलेला असल्याचे दिसुन आला.
सदर इसमास वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन अचानकपणे छापा टाकुन तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना जागीच शिताफीने पकडुन त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव तौफिक रझाक शेख, वय २६ वर्षे, रा. नवाजिश चौकाजवळ, हयात हॉटेल समोर गल्लीमध्ये, विलाल मजिद बाजुला, मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेता त्याचे कब्जात १६,२००/-रु.कि.चा ८१० ग्रॅम वजनाचा गांझा हा अंमली पदार्थ, त्याकामी वापरलेली दुचाकी, मोबाईल हॅन्डसेट आणि त्यातुन मिळालेली रोख रक्कम असा एकुण ८०,१००/-रु.कि.चा मुद्देमालासह मिळुन आल्याने त्यांच्या वर वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३८७/२०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (त्त्) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हयाचा तपास हा सहा. पोलीस निरिक्षक उनाकांत महाडिक हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही गा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे नार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो. स्टे. पुणे शहर श्री. विजयकुमार डोके यांचे सुचना प्रभाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंगलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विठ्ठल चोरमले, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद यांनी केली आहे.








