भांडयाचे दुकान फोडणारे चोरटे वाघोली पोलिसांनी केली अटक.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
वाघोली :दिनांक ३१/०७/२०२५ रोजी रात्री ०२:०० वा. सुमारास वाघोली पोलीस स्टेशन हददीमध्ये श्री. कृष्णा मेटल्स भांडयाचे दुकान, प्रियंकानगरी, वाघोली पुणे येथील सदर दुकानाचे शटर अनोळखी तीन इसमांनी उचकटून तोडून दुकानातुन रोख रक्कम चोरी करून रिक्षा मधून पळून गेल्या बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८०/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१ (४), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हाचा तपास करत असताना महिला पोलीस उप-निरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार समीर भोरडे, प्रविण केदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे दाखल गुन्हा उघडकीस आणून आरोपी नाव १) अनिकेत अविनाश इंगळे वय २१ वर्षे, रा. बिरादारनगर, वैदुवाडी, हडपसर, पुणे २) साहिल रोशन शेख वय २० वर्षे, रा. सदर व एक विधीसंघर्षात बालक यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडे अधिक तपास केला असता त्यांनी हडपसर भागातून रिक्षा चोरी करून वरिल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपी १ ते २ यांना अटक करून त्यांच्या कडून रोख रक्कम व रिक्षा असा एकूण ५९,०१०/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ४, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, श्री युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वाघोली पोलीस स्टेशन श्री. आसाराम शेटे, तपास पथक पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, महिला पोलीस उप-निरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण व प्रविण केदार यांनी केली आहे.








