वानवडी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या गुन्हेगारास वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
वाणवडी :सदर घटना ही दिनांक ०३/०८/२०२१ रोजी सायं. १७:०० वा. ते दि.२९/१०/२०२१ रोजी सायं. १९:३० वा.च्या दरम्यान आरोपीच्या राहत्या घरी राधिका एम्पायर, जगताप नगर, वानवडी, पुणे येथे घडली आहे. यातील आरोपी संजय रमेश शर्मा, वय ५६ वर्षे, रा. राधिका एम्पायर, जगताप नगर, वानवडी, पुणे याने पिडीत अल्पवयीन निर्भया ही क्लास साठी त्याच्या घरी आली असताना तिला बेडरुममध्ये घेऊन जाऊन तिला तिच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी देऊन ती अल्पनवयीन असल्याची जाणिव असताना तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला आहे. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ३९३/२०२१ भा.दं. वि. कलम ३७६,३७६ (३) सह वालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४ (२), ५ (एल), ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक श्रीमती सुधा चौधरी, सध्या नेमणूक बृहन्मुंबई यांनी केला व यातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. अतिरीक्त सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय (बा.लैं.अ.सं.का.) शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपी संजय रमेश शर्मा यास दि.२३/०९/२०२५ रोजी २० वर्षे सश्रम कारावास व ३७ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास नऊ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर केस मध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्री. नितीन कोंघे, कोर्ट पैरवी श्री. दिनेश जाधव यांनी कामकाज पाहिले. सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी पर्यवेक्षण केले आहे.








