सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांचा भव्य सत्कार.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि. 23 सप्टेंबर रोजी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्या बद्दल डॉ. संजय रोडगे यांचा श्रीराम प्रतिष्ठान, सेलू संचलित विविध घटक संस्थांच्या वतीने मंगळवारी भव्य सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम विद्या विहार संकुल, रवळगाव रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी कायदा व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणारे ऍडव्होकेट दत्ता कदम यांचाही सन्मान करण्यात आला.सत्कार सोहळ्यास सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे यांच्यासह विविध घटक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा चे प्रास्ताविक अपूर्वा तंत्रनिकेतन चे प्राचार्य अशोक बोडखे यांनी केले. दिगंबर टाके यांनी सूत्र संचालन केले तर संदीप आकात यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
संपूर्ण कार्यक्रमात डॉ. रोडगे यांच्या नेतृत्वगुणांबाबत गौरवोद्गार काढण्यात आले. शेतकरीहितासाठी व शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव सर्व वक्त्यांनी केला.या सत्कारा मुळे परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते.








