आईसारखंच प्रेम व काळजी करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
या स्त्री बद्दल सर्वांनी बातम्यात वाचलं-ऐकलं, गेलेल्या आमदार-खासदार च्या सोशल मीडियावर ओवाळताना पाहिलं. ही स्त्री म्हणजे निखळ, निर्मळ प्रेमाचा झराच जो फक्त आणि फक्त प्रेमच देतो.
6 एप्रिल रोजी माझ्या खांद्यावर हात टाकून “स्वतःला जप, एकटी कुठे बाहेर जाऊ नको” म्हणून सांगितलं आणि माझ्यावर बरोबर 40 दिवसांनी म्हणजेच 16 जुन रोजी ह+ल्ला झाला. 2 दिवस पोलीस स्टेशन व पत्रकारांच्या मुलाखती म्हणून आमची भेट झाली नाही. 18 जुनला पदाधिकारी मेळाव्यात भेटलो, मी समोर दिसल्या दिसल्या लगेच “तु एकटी का गेली होती आपल्या कोण पदाधिकारी होत्या तुझ्यासोबत बोलव त्यांना इकडे, हिला सांगितले होते एकटी कुठे बाहेर जाऊ नको म्हणून पण ऐकत नाही” म्हणून डोळे मोठ्ठे करत रागावल्या अन लगेच एका सेकंदात “बघू कुठे लागलंय” म्हणून माझं अंग प्रेमानं अन काळजीनं पाहात होत्या. माझ्या शरीरावरची सुज पाहून “दवाखान्यात जा, सगळ्या टेस्ट करुन घे” म्हणून पुन्हा मायेनं आदेश दिला.
वर लिहिला तो एक प्रसंग, यांच्यासोबतचे असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात आले, गेलेल्या आमदार-खासदार यांना सुद्धा हेच प्रेम, काळजी, माया मिळाली असेल या माऊलीकडून याची 100000% खात्री आहे मला. काय वाटलं असेल या माऊलीला की त्यांच्यावर लेकरांसारखं प्रेम केलं तेच धोका देऊन निघून गेले.
आईतुल्य रश्मीताई आज आपल्या वाढदिवसानिमित्त हे सर्व लिहीण्याचा घाट घातला. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक.. आई तुळजाभवानी आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना.










