शालेय जिल्हा सेपक टकारा क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालयाचे वर्चस्व.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे व जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 सप्टेंबर रोजी नूतन विद्यालय इनडोअर क्रीडा हॉल मध्ये शालेय जिल्हा सेपक टकारा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नूतन संस्था सचिव डॉ .व्हि.के.कोठेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, प्रमुख पाहुणे संस्था सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, पर्यवेक्षक रोहिदास मोगल ,डी.डी.सोन्नेकर, मुख्याध्यापक देशपांडे,जिल्हा सचिव गणेश माळवे, तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.शालेय जिल्हा ग्रामीण क्रीडा स्पर्धेत १४/१७/१९ वर्षे आतील मुले मुली एकुण ३२ संघांतील १६० खेळाडू सेलू, पाथरी, जिंतूर, गंगाखेड, पुर्णा, तालुक्यातील सहभाग नोंदवला. स्पर्धेत पंच म्हणून संजय भुमकर, किशोर ढोके,अनुराग आंबटी, कुणाला चव्हाण, प्रा. सत्यम बुरकुले, सुरज शिंदे, जुलाह खुदुस, केंद्रे पांडुरंग, प्रमोद गायकवाड, दिपक जोरगेवार यांनी काम पाहिले.शालेय जिल्हा सेपक टकारा क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:-
१४ वर्षे मुले: नूतन विद्यालय सेलू (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय), व्हिजन इंग्लिश स्कूल सेलू (तृतीय)
१४ वर्षे मुली:- नूतन विद्यालय सेलू (प्रथम), ज्ञानर्तिथ विद्यालय सेलू (व्दितीय), शां.न.वि.पाथरी
(तृतीय)
१७ वर्षे मुले: नूतन विद्यालय सेलू (प्रथम), बा.बि.नूतन इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय), प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू (तृतीय)
१७ वर्षे मुली:- नूतन विद्यालय सेलू (प्रथम), नूतन कन्या प्रशाला सेलू (व्दितीय), प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू (तृतीय)
१९ वर्षे मुले: नूतन महाविद्यालय सेलू (प्रथम), पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर वि.पाचलेगांव जिंतूर, (व्दितीय), कला व वाणिज्य महाविद्यालय गंगाखेड (तृतीय).
१९ वर्षे मुली:, पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर वि.पाचलेगांव जिंतूर (प्रथम),
नूतन कन्या प्रशाला सेलू ( (व्दितीय), कला व वाणिज्य महाविद्यालय गंगाखेड (तृतीय).









