भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी सहा महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस अटक
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २७८/२०२५ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयामध्ये मागील सहा महीन्यापासून फरार असलेला आरोपी मलिकार्जुन ऊर्फ मंजु साहेबराव पाटील वय १९ वर्षे धंदा व्यवसाय रा. गंगोत्री अपार्टपेट लेन नं.२६ सुखसागरनगर कात्रज पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार सागर बोरने व मितेश चोरमोले यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा आरोपी कात्रज सुखसागर नगर येथे थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अंमलदार यांनी सुखसागरनगर, कात्रज, पुणे येथे जावून आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक २३/०९/२०२५ रोजी १२.१५ वा अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे सो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आचारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, सचिन सरपाले, सागर कोंडे, अभिनय चौधरी, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अवधूत जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.








