अहिल्यानगर हादरलं, पोलीस निरीक्षकांने शारीरिक सुखाचा आनंद घेतला, पोलीस निरीक्षक दराडेंवर पालघर जिल्ह्यात बलात्कारांचा गुन्हा दाखल..!!
प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी-
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये 30 वर्षीय पीडित तरुणीने बलात्कार,दमदाटी, जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात पोलीस निरीक्षकांच्या विरोधांत गंभीर स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी तो गुन्हा मनोर पोलीस स्टेशन पालघर ( जि. ठाणे ) येथे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून कोतवाली पोलीस ठाणेचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधांत तक्रारदार महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत आरोपी प्रताप पांडुरंग दराडे रा. अकोले ता. इंदापूर जि. पुणे ) यांनी मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले, जोगेश्वरी वेस्ट मुंबई येथे हे शारीरिक संबंध ठेवण्यात आले असाही आरोप केला आहे. यावेळी पीडितेने जेव्हा पोलीस निरीक्षक दराडे यांच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला, तिला जे काही आपल्यात घडलं ते विसरून जा ! असे म्हणून शिवीगाळ केली आणि पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करताच तुला जे करायचं ते कर, अशी दमदाटी धमकीही दिली तसेच जीवे मारण्याची असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण आईल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर इतका गंभीर आरोप झाल्यामुळे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून आरोपींवर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण राज्यांचे लक्ष लागले आहे. मात्र अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गंभीर दखल घेवुन कोतवाली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली आहे. तोफखाना पोलीस ठाणेच्या पोलीस निरीक्षकांकडे तात्पुरत्या स्वरूपात कोतवाली पोलीस ठाणेचा पदभार देण्यात आला आहे.








