अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रेकॉर्डवरील ५० हून अधिक गुन्हे असणा-या गुन्हेगारास नाशिकमधून गुन्हे शाखा पुणे यांनी केली अटक
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे दि.०३/०७/२०२५ रोजी पृथ्वी एक्सचेंज इंडीया लि. ऑफीस स.नं ३६ गोल्ड फिल्ड प्लाझा, वाडिया कॉलेजजवळ पुणे येथील ऑफीसमध्ये घरफोडी झाली होती. सदरबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल होता. सदर ठिकाणीच्या चान्सपिंन्ट वरुन अंगुलीमुद्रा विभागाने आरोपी नाव रामनिवास मंजू गुप्ता, वय ३७ वर्षे, रा.महू मध्यप्रदेश विठठलवाडी ठाणे याचे असल्या बाबत माहिती मिळाली होती.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ०२ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजूम बागवान व पोलीस अंमलदार असे सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेत असताना सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर आरोपी नाशिक येथे येणार आहे. त्याबाबत सदर माहिती वरिष्ठांना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक पोलीस स्टेशन मदतीने शिताफीने सापळा लावून आरोपी नाव रामनिवास मंजू गुप्ता, वय ३७ वर्षे, रा. महू मध्यप्रदेश / विठठलवाडी ठाणे यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने पुणे शहरातील कोरेगाव पार्क व येरवडा पोलीस स्टेशन कडील घरफोडीचे दोन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीस कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गुन्हयात अटक करण्यात आले असून अधिक तपास चालू आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा-२ पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजूम बागवान, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार ओम कुंभार, आबनावे, नेवसे, शिंदे, भिलारे, चव्हाण, सरडे, ताम्हाणे, जाधव, मोकाशी, पवार, टकले, निखील जाधव, संजय आबनावे व विनायक वगारे यांनी केली आहे.








