सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉ. संजय रोडगे.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
अकरा विरुद्ध सहा मतांनी विजय.
निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली.
सेलू – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी डॉ. संजय रोडगे यांची बहुमतांनी निवड करण्यात आली. मागील अनेक दिवसापासून बाजार समितीच्या सभापती निवडीला पूर्णविराम मिळाला आहे. बाजार समितीचे तत्कालीन सभापती चक्रधर पौळ यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत राजीनामा दिला होता. दरम्यान सोमवार 22 रोजी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संदीप तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणे तर 11:15 अर्जाची छाननी व बारा वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रिया सुरुवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती ही दिनांक24/10/1931 रोजी अस्तित्वात आलेल्या बाजार समिती आजपर्यंत सभापती आणि प्रशासकीय अधिकारी यांचे एकूण १३ तत्कालीन सभापतीने कारभार चालवला. यामध्ये रंगनाथ पाटील, आबा झोडगावकर, रावसाहेब वाघ, विठ्ठलराव वाघ, दत्तराव मोगल, रवींद्र डासाळकर, दिनकर वाघ, मुख्य प्रशासक मंगेश सुरवसे डीडीआर प्रशासक माधव यादव एकूण 13 तत्कालीन सभापती यांच्यानंतर 14 कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापतीपदी उच्चशिक्षित सभापती लाभले. यांना 11 संचालकांनी मतदान केले यामध्ये डॉ. संजय रोडगे, अँड. दत्तराव कदम, अनिल पवार, प्रसाद डासाळकर, अनिता ताठे, वर्षा सोळंके, शैलेश तोष्णीवाल, अनिल बर्डे, रामेश्वर राठी, गोकर्ण पडघन, छाया राऊत यांनी हात वर करून डॉ. संजय रोडगे यांच्या नावाला पसंती दाखवली आणि त्यांचे विरोधात उभे असलेले नामदेव डख यांना सहा मतदान झाले, अकराविरुद्ध सहा मताच्या फरकाने डॉ. संजय रोडगे यांचा विजय झाला.
मा. ना. मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते डॉ. संजय रोडगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक चक्रधर पौळ हे गैरहजर राहिले तर 18 संचालकापैकी 17 संचालक उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रिया दरम्यान प्रशासकाकडून प्रशासकीय अधिकारी संदीप तायडे यांनी काम पाहिले.
सभापतीपदी निवड झाल्यानंतर भव्य अशी रॅली काढून सर्व व्यापारी व इतर संघटनाने नवीन सभापती डॉ. संजय रोडगे यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ. संजय रोडगे म्हणाले की, मा. ना. मेघनादीदी साकोरे बोर्डीकर, मा. रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, मा. गंगाधरजी बोर्डीकर (अंकल) व सर्व संचालक यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासास कधीही तडा जाऊ देणार नाही. पदभार स्वीकारल्यानंतर नक्कीच शेतकऱ्यांच्या हितावह तसेच व्यापाऱ्यांच्या हितावह निर्णय घेऊन सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक नंबरची बाजार समिती करण्याचा माझा मानस आहे. असे यावेळी बोलतांना म्हणाले.









