अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जिल्ह्यातील सर्वसामान्यांना मिळाला मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रियेसह चष्म्यांचा आधार
नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानाने
ग्रामीण भाग काढला पिंजून
मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यत निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि.22 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय तथा मदत कक्ष यांच्या समन्वयाने नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत प्रभावीपणे पोहचले आहे. सद्यस्थितीत या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 11 प्रतिथयश रुग्णालय सहभागी झाली आहेत. यामध्ये नागपूर महानगर पालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ज्योतिबा फुले योजने अंतर्गत असलेले रुग्णालय व धर्मार्थ रुग्णालय यांचा सहभाग आहे.
असून एकूण 42 आरोग्य शिबीरे घेण्यात आली आहेत. यातून सूमारे 4 हजार 562 रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे सदस्य सचिव तथा कक्ष प्रमुख डॉ. सागर पांडे यांनी दिली.
शिबीरामध्ये ज्या रुणांच्या तपासण्या झाल्या त्यातील आजाराच्या स्थितीनुसार द्वितीय स्तरीय निदानात्मक तपासण्या व उपचारात्मक सेवेसाठी 526 रुग्णांना संदर्भीत करण्यात आले. सदर रुग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर नेत्र विषयक शस्त्रक्रिया संदर्भात आहेत. सुमारे 1 हजार 175 गरजु रुग्णांनी चष्मा करीता नोंदणी केली असून सूमारे 856 रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मोतीबिंदू वगळून इतर नेत्र विषयक आवश्यक असलेल्या 161 शस्त्रक्रिया आज अखेर पार पाडल्याची माहिती डॉ. सागर पांडे यांनी दिली.
*प्रत्येक गरजु रुग्णापर्यंत पोहचण्याचा आमचा निर्धार*
– डॉ सागर पांडे, सदस्य सचिव तथा कक्षप्रमुख
संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकगरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यापुढे ठेवून सुरू केलेले ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ प्रेरणादायी व महत्त्वपूर्ण आहे. या अभियानातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत मोफत नेत्रचिकीत्सा करण्यात येत आहे. विशेषतः झोपडपट्टी व भटक्या समाजातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे. जे रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेऊ शकत नव्हते, त्यांनाही मोफत उपचाराची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध झाली आहे.









