अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सातारकरांनो, नवरात्र उत्सव साजरा करताय,पण प्रशासनाच्या नियमांचे पालन करा: पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!!
कलावती गवळी सातारा जिल्हा प्रतिनिधी
गणेश उत्सवानंतर आता नवरात्री उत्सव सुरू होणार असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. नवरात्र उत्सव साजरा करताना पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करा विशेष म्हणजे डीजे, लेझर बीम लाईट चा वापर टाळा आणि शांतता राखणे आवश्यक आहे. उत्सव मंडळांनी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेवुन उत्सव शांततेत साजरा करावा. उत्सवात कोणताही व्यक्तीने कायदा हातात घेतल्यास किंवा पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार आहात असेही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. बऱ्याचदां पोलीस प्रशासन सणासुदीच्या काळात अशी आव्हानं करतात जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सण उत्सव शांततामय, सुरक्षितपणे पार पडावा. तसेच मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हानं देखील करण्यात आले आहे. यावेळी सातारा पोलीस दलाने माब ड्रिल ( गर्दी नियंत्रणाचा सराव ) आयोजित करून सातारा पोलिसांकडून तयारीचा आढावा घेतला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत. (पोलीस सज्जतेचे मुद्दे ) नवरात्र उत्सवादरम्यान महिला आणि तरुणींच्या सुरक्षेतेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. (कायदा आणि सुव्यवस्था ) उत्सवादरम्यान शांतता राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सातारा पोलीस प्रशासन सज्ज आहे. यंदाही जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणेच्या हद्दीमध्ये गणेशोत्सव उत्सव देखील शांततापूर्वक आणि आनंदात साजरा झाला. नवरात्र उत्सव हा पारंपारिक पद्धतीत तसेच शांतता व सुव्यवस्था सण शांततामय आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यावर भर द्यावा : असेही पोलीस अधीक्षकांनी आव्हान केले आहे.








