अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
रिपब्लिकन सेनेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन,
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी, पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेना पुणे शहराच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल यांच्या हस्ते स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण थिएटर समोरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी पुणे शहर महासचिव सुरेंद्र घेसास, रिपब्लिकन सेना पुणे शहर उपाध्यक्ष संतोष साखरे, अनिल खलसे, गजानन साळुंखे, विनोद कांबळे, सचिन वाघमारे, संजय सावंत. आदि यावेळी उपस्थित होते,
