Hingoli suicide Case: खोट्या गुन्ह्याच्या धमकीने धास्तावलेल्या रोजगार सेवकाची उंदिर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या
हिंगोली प्रतिनिधी श्रीकांत शिंदे
सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील घटना चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली/पानकनेरगाव (Hingoli suicide Case) : सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील रोजगार सेवकाला अॅट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने भितीपोटी त्याने उंदिर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या (Hingoli suicide Case) केल्याने सेनगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील रोजगार सेवक भागवत बळीराम मुंढे (३९) यास आरोपीतांनी घरकुलाचे पैसे त्याच्या खात्यात जमा होत नसल्याच्या कारणावरून त्याच्या सोबत १४ सप्टेंबर रोजी वाद घालून त्याच शिवीगाळ करून अॅट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तसेच अपमान कारक बोलल्या मुळे त्याला हा अपमान सहन झाला नसल्याने या त्रासाला कंटाळून भागवत मुंढे याने विषारी औषध प्राशन केले होते.
त्यानंतर त्यांना तात्काळ हिंगोलीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचाराकरीता हलविण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या (Hingoli suicide Case) प्रकरणात २१ सप्टेंबरला सेनगाव पोलिस ठाण्यात भारत बळीराम मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तराव कुंडलीक खंदारे, शेषराव लिंबाजी डाखोरे, सुभाष भागोराव डाखोरे, ज्ञानेश्वर आनंदराव नरवाडे या चौघाविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या (Hingoli suicide Case) घटनेमुळे शनिवारी गावामध्ये काहीसा तणाव झाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक मस्के यांनी फौजफाटा घेवून बंदोबस्त तैनात केला. यानंतर मयत भागवत मुंढे यांचे शवविच्छेदन सेनगाव येथील रुग्णालयात करण्यात आले. मयत भागवत मुंढे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी , भाऊ, भावजय असा परिवार आहे. या गुन्ह्यातील चारही आरोपींना सपोनि दिपक मस्के, पोउपनि रविकिरण खंदारे, राजेश जाधव, तुकाराम मार्कड, टि.के.वंजारे, काशिनाथ शिंदे यांनी अटक केली.








