अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सतीश जाधव यांना २०२५ चा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि. २१ रविवार रोजी शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविणारे ,ज्यांचे कार्य सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आहे असे सतिश सदाशिव जाधव यांना इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई यांनी सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव यांचा समाजभूषण पुरस्कार 2025 देऊन दि 20 सप्टेंबर शनिवार रोजी विश्वनाथ भावे नाटय़गृह वाशी नवी मुंबई येथे शाल हार पुष्पगुच्छ तसेच समाजभूषण पुरस्कार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या समारंभास पालकमंत्री ना.गणेश नाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरदरावजी ढोले, धर्मजागरण प्रमुख कोकन प्रांन्त राजेशजी कुंटे,अखिल भारतीय मातंग संघाच्या अध्यक्षा कुसुम बाबासाहेब गोपले आयोजक दिलीपकुमार राजेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, कल्याण साठे संतोष जाधव, अॅड राम चव्हाण गुलाबराव साठे, अशोकराव शिंदे आदि जण सोबत होते.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सतीश जाधव यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. प्रा के डी वाघमारे, लक्ष्मण केदासे, सुनील गायकवाड,राजेश ढवळे, शुकाचार्य शिंदे, रामप्रसाद बोराडे, सटवाजी साठे, महादेव लोंढे, आश्विन केदासे, श्रीपाद रोडगे ,शामराव मचाले, विठ्ठल गजमल, आसाराम घाटुळ आदींनी अभिनंदन केले.








